उद्यान विभागातील कंत्राटी कामगारांच्या अर्धकुशल वर्गवारी संधर्भात कामगार नेते रवींद्र सावंत यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांची भेट घेतली.
महापालिकेतील कंत्राटी कामगारांना राज्य शासनाच्या उद्योग,ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक २४.०२.२०१५ रोजीच्या आधीसूचनेनुसार व मा. सर्वसाधारण सभेच्या ठराव क्र.१२७२ दि.१५.०२.२०१७ नुसार किमान वेतन लागू केले आहे व कामगारांना कुशल, अर्धकुशल व अकुशल या वर्गवारीनुसार वेतन देण्यात येत आहे. परंतु महापालिकेतील उद्यान विभागामध्ये शासन निर्णयाची पडताळणी न करता माळी या पदास अकुशल या वर्गवारी मध्ये समाविष्ट…