Headlines

Thackeray bhaubeej: ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी

Thackeray bhaubeej: ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी
Thackeray bhaubeej: ठाकरे बंधूंची भाऊबीजही एकत्र; 4 महिन्यात कितव्यांदा भेटले राज अन् उद्धव, मनोमिलनाची A टू Z स्टोरी



आगामी मुंबई महापालिका (Mumbai) आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे आता जवळपास निश्चित झालं आहे. कारण, गेल्या 4 महिन्यात ठाकरे बंधू आणि ठाकरे कुटुंब वारंवार एकत्र येताना दिसून येत आहे. त्यातच आज पुन्हा एकदा राज (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) भाऊबीज सणानिमित्ताने बहिणीच्या घरी येत आहेत. उद्धव आणि राज ठाकरे त्यांच्या चुलत बहीण जयजयवंती यांच्या घरी भाऊबीजेसाठी आले आहेत. त्यानिमित्ताने ठाकरे बंधू आणि कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं.

आदित्य आणि तेजस ठाकरे हेही ठाकरे कुटुंबातील भाऊबीज स्नेह भोजन कार्यक्रमानिमित्त एकत्र आले आहेत. त्यामुळे, गेल्या 4 महिन्यातील ही ठाकरे बंधूची आजची 10 वी भेट आहे. काही दिवसांपूर्वी दीपावली दीपोत्सव निमित्ताने राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे, यांसह ठाकरे कुटुंब एकत्र आले होते. त्यावेळी, दोन्ही कुटुंबातील स्नेहबंध महाराष्ट्राने पाहिले. त्यामुळेच, आता ठाकरे बंधुच्या युतीची औपचारिक घोषणा कधी होणार याची उत्सुकता महाराष्ट्राला आहे, आता ही घोषणा कधी होणार हेच पाहावे लागेल? 

दरम्यान, ठाकरे बंधूंच्या भेटीवर राजकीय वर्तुळातूनही प्रतिक्रिया येत आहेत, विरोधकांकडून या भेटीवर टीका केली जात आहे. तर, काही जणांकडून दोन बंधू एकत्र येत असतील तर हा चागंली गोष्ट असल्याचे बोलले जात आहे. मात्र, मुंबई महापालिका भाजप महायुतीच जिंकेल असा विश्वास देखील विरोधकांकडून व्यक्त होत आहे.  

ठाकरे बंधुच्या आजपर्यंत 10 वेळा गाठीभेटी, कधी आणि कुठे?

५ जुलै – २०२५ ला मराठी भाषेच्या मेळाव्यात हे दोन्ही बंधू एकाच मंचावर आले.

२७ जुलै- २०२५ – मराठी भाषा मेळाव्यानंतर जवळीक वाढली आणि थेट राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मातोश्री या निवासस्थानी दाखल झाले

२७ ऑगस्ट- २०२५ 
तब्बल दोन दशकानंतर उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात सहकुटुंब गणरायाचे दर्शन घेतले 

१० सप्टेंबर – २०२५ 
उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांच्या सोबत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी दाखल झाले…

५ ऑक्टोंबर – २०२५, 
खासदार संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्याला एकत्र सहकुटुंब आले.त्याच दिवशी राज ठाकरे कार्यक्रम संपल्यानंतर मातोश्रीवर पोहोचले 

१२ ऑक्टोबर २०२५
राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी गेलेले पाह्यला मिळाले.

१७ ऑक्टोबर २०२५ – मनसे दीपोत्सव उद्घाटन हे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी संपूर्ण कुटुंब एकत्र 

२२ ऑक्टोबर २०२५ – राज ठाकरे यांच्या आईंच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे शिवतीर्थ निवासस्थानी भेट घेण्यासाठी 

२३ ऑक्टोबर २०२५ – निमित्त भाऊबीज ठाकरे कुटूंब पुन्हा एकत्र येणार

हेही वाचा

मुंबईच्या जोगेश्वरीमधील JMS बिजनेस पार्क इमारतीमध्ये भीषण आग; अनेक मजले भक्ष्यस्थानी, अडकलेल्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *