
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) गेले ही आनंदाची बाब असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. यात राजकीय का पाहता? आमच्याही उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा आहेत. वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला जाणं, यात राजकारण पाहणं योग्य नाही असेही फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आहे आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे, हे तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही दिसेल असे फडणवीस म्हणाले. मात्र काही पक्षांच्या नेत्यांच्या मनात काय आहे, हे महाराष्ट्राच्या मनातलं आहे असे म्हणणे योग्य नाही. हे फार मोठे स्टेटमेंट होईल असे फडणवीस म्हणाले.
राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार
मंत्री संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यात बैठकांच्या मुद्यावरुन झालेल्या पत्रव्यवहाराबाबत देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. असं पत्र लिहून कोणीही वाद निर्माण करु नये. मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी मला येऊन सांगावं, त्यातील अडचण दूर करता येईल. मंत्री आणि राज्यमंत्री दोघेही शासनाचे भाग आहेत, सर्व अधिकार मंत्र्यांकडे असतात असे फडणवीस म्हणाले. मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात, यात कुठलाही संशय नाही. मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असे मानणे हे चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये काही धोरणात्मक निर्णय होत असतील, तर ते मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेऊ नये किंवा घेतल्या तर मंत्र्यांची मान्यता घेतली पाहिजे. मंत्री आणि राज्यमंत्री यांनी सामांजस्य दाखवले पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोलले पाहिजे असे फडणवीस म्हणाले.
पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरण, काय म्हणाले मुख्यमंत्री?
पुण्यात रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. या रेव्ह पार्टीवरील कारवाईत एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. यावर देखील मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी पण ही माहिती माध्यमातून घेतली आहे, कारण मी सकाळपासून विविध कार्यक्रमांमध्ये फिरतो आहे. त्यामुळे मला ब्रीफिंग घेता आलेलं नाही. मात्र, जे माध्यमात दिसलं त्याप्रमाणे पुणे पोलिसांनी एका रेव पार्टीवर कारवाई केली आहे. त्यामध्ये काही लोक सापडले आहे. त्यामध्ये काही ड्रग्स वगैरे सापडले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांकडून पूर्ण ब्रीफिंग घेतल्यानंतर यावर बोलू शकेल. मात्र प्राथमिकदृष्ट्या असा प्रकारचा गुन्हा त्या ठिकाणी घडल्याचा दिसून येत आहे.
नागपूर जिल्ह्याचा पुढील 30 वर्षाचा “कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन” सर्व लोकप्रतिनिधी समोर ठेवण्यात आला. राइट्स या संस्थेला नागपूर जिल्ह्याचा पूर्ण कॉम्प्रेन्सिव्ह मोबिलिटी प्लान तयार करण्यास सांगितला होता, त्यात विद्यमान नागपूर शहर जिल्हा ग्रुप सेंटर भविष्यात निर्माण होऊ शकेल असे क्रोध सेंटर लक्षात घेऊन त्या ठिकाणी आवश्यक मोबिलिटीचा प्लॅन तयार करण्यात सांगितले होते. आताच्या मोबिलिटी प्लानमध्ये ज्या अडचणी आहेत त्या दूर करणे, रस्ते मोठे करणे नवीन रस्ते निर्माण करणे, अंडरपास किंवा वर पास तयार करणे उड्डाणपूल तयार करणे, बसची व्यवस्था करणे, ट्रॅफिक सिग्नल ची व्यवस्था पाहणे, फुटपाथ ची व्यवस्था पाहणे हे सांगण्यात आले होते. लवकरच जनतेसाठी हा कॉम्प्रेसिव्ह प्लान खुला केला जाईल जनतेकडून सूचना घेतल्या जातील.
महत्वाच्या बातम्या:
Uddhav Thackerays Birthday: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे मातोश्रीवर दाखल; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी
आणखी वाचा