महाराष्ट्रातून सुटलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भरकटला; गोव्याला निघालेली ट्रेन पनवेल ऐवजी कल्याणच्या दिशेला गेली आणि…

महाराष्ट्रातून सुटलेल्या वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भरकटला; गोव्याला निघालेली ट्रेन पनवेल ऐवजी कल्याणच्या दिशेला गेली आणि…


CSMT Madgaon Vande Bharat Express : भारतात वेगवेगळ्या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आला आहे. वंदे भारत एक्सप्रेसमुळे सुसाट प्रवास होत असल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, वंदे भारत एक्सप्रेसचा मार्ग भरकटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.  मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटलेल्या CSMT – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस  पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने वळली. यामुळे एकच गोंधळ उडाला. 

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार CSMT – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस दिवा-पनवेल मार्गाने जाणार होती.  कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वे याच मार्गाने धावतात. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथून सुटलेल्या  CSMT – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस  सकाळी 6.10 वाजता दिवा स्थानकाच्या पुढे कल्याणच्या दिशेने वळली. सिग्नलमधील त्रुटीमुळे हा गोंधळ झाला. दिवा जंक्शन येथे डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक 103 वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी सांगितले.

 रेल्वेच्या मुंबई लोकल ट्रेन सेवेवर देखील याचा मोठा परिणाम झाला. या गोंधळानंतर CSMT – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस कल्याण स्थानकात थांबवण्यात आली. यानंतर पुन्हा ही एक्सप्रेस दिव्याला परत पाठवण्यात आली. दिवा येथे पोहोचल्यानंतर पुन्हा ही एक्सप्रेस दिवा-पनवेल या निश्चित मार्गाने मडगावकडे रवाना झाली. मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवा जंक्शनवर सकाळी 6.10 ते 7.45 या वेळेत सुमारे 35 मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली होती.

पाचव्या मार्गाने ही एक्सप्रेस 7.04 वाजता कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर पोहोचली. सायंकाळी  7.13 वाजता सहाव्या मार्गाने ही एक्सप्रेस दिवा स्थानकात परत आणण्यात आले.  जून 2023 मध्ये CSMT-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मध्ये सुरू करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, मुंबई येथून सकाळी 5:25 वाजता सुटते आणि त्याच दिवशी दुपारी 1:10 वाजता मडगाव, गोवा येथे पोहोचते. मात्र, या सिग्नलच्या गोंधळामुळे CSMT – मडगाव वंदे भारत एक्सप्रेस जवपास दीड तास उशीरा पोहचली. 

 





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *