पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील होडींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेबाबत तसेच विनापरवानगी बेकायदेशीरपणे होडींग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणेची नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांची मागणी…

पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील होडींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करणेबाबत तसेच विनापरवानगी बेकायदेशीरपणे होडींग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करणेची नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांची मागणी…

पावसाळा आता अवघ्या १५ दिवसावर आलेला आहे. पावसापूर्वी अवकाळी पाऊस, सोसाट्याचा वारा हे ओघाने आलेच. सोमवारी, दि. १३ मे रोजी वादळी वारे आणि अवकाळीमुळे मुंबई शहरात होडींगमुळे झालेल्या अपघाताच्या घटनेने अंगावर शहारे येत आहेत. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात सायन-पनवेल महामार्ग, कामोठे, तळोजा, पनवेल शहर, स्वारघर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होडींग लागलेले आहेत. पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील अंर्तगत व बाह्य मार्ग, बर्दळीचे परिसर, चौक व उद्यान तसेच क्रिडागणे व अन्य सार्वजनिक ठिकाणी, शहरातील मुख्य विभागातील गृहनिर्माण सोसायटीचे आवार, गधीवरील परिसर या ठिकाणी हे होडींग लागलेले आहेत. मुळातच यातील किती अधिकृत आहेत, हेच प्रश्नचिन्ह आहे. या अनधिकृत होडींगमुळे पालिका प्रशासनाचा मोठ्या प्रमाणावर महसूलही बुडत आहे. मुंबईत सोमवारी घडलेल्या घटनेमुळे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील होडींगच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळापूर्व वादळी वारे, अवकाळी पाऊस यामुळे या होडींगमुळे पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातही गंभीर घटना घडण्याची भीती आहे. होडींगच्या ठेकेदारांना होडींगबाबत साईज, मुदत याबाबत दर्शनी भागात विस्तृत माहिती लावण्याचे आदेश देवून पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील सर्वच होडींगचे तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे व विनापरवानगी लावण्यात आलेल्या अनधिकृत होडींग लावणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, ही मागणी नवी मुंबई काँग्रेस प्रवक्ते रविंद्र सावंत यांनी केली.

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *