
अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धाच्या परिणामामुळे देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेला जळगावातील सराफ बाजारावर मोठ्या प्रमाणे होत आहे. युद्धामुळे कच्च्या तेला संदर्भात सुरू असलेले क्रायसिस आणि निर्यात आयात ठप्प झाल्यामुळे सोन्या चांदीचे मार्केट अस्थिर झाले आहे.
युद्धाला सुरुवात झाल्यापासून सराफ बाजारात सोन्या दरात गेल्या 16 दिवसात तब्बल 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात 34 हजार रुपयांची घसरण झाली आहे. यामुळे सोन्या चांदीचे मार्केट अस्थिर झाले आहे.
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. 10 ग्रॅम सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर चांदीच्या दरात चार हजार रुपयांची घसरण झाली आहे.
आज 10 ग्रॅम सोन्यासाठी जीएसटीसह 1 लाख 61 हजार 195 रुपये मोजावे लागणार आहेत. तर एक किलो चांदीसाठी 2 लाख 63 हजार 680 रुपये मोजावे लागणार आहेत. अमेरिका व इराण यांच्यात युद्ध सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या दरामध्ये चढ-उतार सुरू आहे.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)