मुंबईतील टॉप 10 पर्यटन स्थळे; यापैकी बरीचं ठिकाणं अनेकांनी मुंबईत राहूनही पाहिली नसतील

मुंबईतील टॉप 10 पर्यटन स्थळे; यापैकी बरीचं ठिकाणं अनेकांनी मुंबईत राहूनही पाहिली नसतील


Top Ten Tourist Places In Mumbai : मुंबई हे शहर देशाची आर्थिक राजधानी आहे. अनेक बड्या कंपन्यांची कार्यालये, पंचतारांकित हॉटेल तसेच फिल्मसिटी यामुळे मुंबईचे महत्व अधोरिखीत होते. मात्र, व्यवसाय आणि उद्योगाव्यतीरीक्त मुंबईची आणखी एक ओळख आहे ती म्हणजे पर्यटन. जगभरातील पर्यटकांचे मुंबई हे सर्वात आवडते डेस्टिनेशन आहे. जाणून घेऊया मुंबईतील टॉप 10 पर्यटन स्थळे कोणती? यापैकी बरीचं ठिकाणं अनेकांनी मुंबईत राहूनही पाहिली नसतील?

1 गेट वे ऑफ इंडिया

गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. गेट वे ऑफ इंडिया हे मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. याच्या जवळच मुंबईतील सर्वात प्रसिद्ध ताज हॉटेल देखील आहे. CSMT रेल्वे स्थानकातून गेट वे ऑफ इंडिया येथे जाण्यासाठी बस मिळते. टॅक्सीने देखील येथे जाता येते.

2 मरीन ड्राईव्ह

मरीन ड्राईव्ह हे देखील मुंबईतील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ आहे. येथे अनेक पर्यटक सूर्यास्त पाहण्यासाठी येतात. चर्नीरोड स्टेशनवरुन येथे जाता येते.

3 गिरगाव चौपाटी

मरीन ड्राईव्ह समुद्र किनाऱ्यावरुन पुढे चालत गेले की थेट गिरगाव चौपाटीला जाता येते. पांढऱ्या रेतीचा हा समुद्र किनारा मुंबईतील लोकप्रिय समुद्र किनारा आहे.

4 जुहू चौपाटी

गिरगाव चौपाटीप्रमाणेच  जुहू चौपाटी हे ठिकाण देखील तितकेच लोकप्रिय आहे. येथे नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते. अंधेरी स्टेशन येथून जुहू चौपाटीला जाण्यासाठी बस मिळते. डायरेक्ट रिक्षाने देखील येथे जाता येते. 

5 नॅशनल पार्क

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान अर्थात नॅशनल पार्कमध्ये खूपच लोकप्रिय आहे. येथे लायन सफारी, नव राणी ट्रेनमधून जंगल सफारी अशी सैर करता येवू शकते.  वन डे पिकनीकसाठी हे बेस्ट ठिकाण आहे. 

6 छोटा काश्मिर

गोरेगाव येथे असलेले छोटे काश्मिर हे  उत्तम पिकनीक स्पॉट आहे. येथे मोठे गार्डन आहे. यासह येथे बोटिंगचाही आनंद लुटता येतो. 

7 कान्हेरी गुंफा

ऐतिहासिक स्थळ पहायचे असेल बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान असलेल्या कान्हेरी गुंफा येथे नक्की जा. येथे बौद्धकालीन लेण्या आहेत. 

8 वांद्रे किल्ला

वांद्रे किल्ला देखील खूपच फेमस आहे. किल्ला परिसरात सुंदर गार्डर तयार करण्यात आले आहे. किल्ल्यावरुन अथांग समुद्र किनारा नजरेस पडतो. याच्या जवळच वांद्रे बॅंड स्टॅंड चौपाटी देखील आहे.

9 ग्लोबल विपस्सना पॅगोडा

गोराई जवळ असलेले ग्लोबल विपस्सना पॅगोडा हे सर्वोत्तम पर्यटनस्थळ आहे.  येथे जगभरातून अनेक जण विपश्यना करण्यासाठी येतात. 

10 राणीची बाग

राणीची बाग अर्थात भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालय हे मुंबईतील सर्वात फेमस पर्यटनस्थळ आहे. हे लहान मुलांचे आवडते पर्यटन स्थळ असल्याने येथे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते.  





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *