नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या सफाई कर्मचाऱ्यांना पालिका प्रशासनाकडून कोव्हिड भत्ता देण्यात आला. या सफाई कर्मचाऱ्यांना कोव्हिड भत्ता मिळावा यासाठी कामगार नेते रविंद्र सावंत यांनी नवी मुंबई इंटक व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा केला होता. रविंद्र सावंत यांच्या पाठपुराव्यामुळेच पालिका प्रशासनाकडून कोव्हिड भत्ता मिळाल्याने परिवहन विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून कामगार नेते रविंद्र सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना महामारीच्या काळात परिवहन उपक्रमाने प्रवासी सुविधेसोबत रुग्णवाहिकेचेही काम केलेले आहे. कोरोना महामारीत जिवितावर मृत्यूची टांगती तलवार असतानाही परिवहनच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी उल्लेखनीय सेवा बजावलेली आहे. सफाई कर्मचाऱ्यांनी दररोज कोव्हिड रुग्णांची ये-जा करणाऱ्या बसेसकम रुग्णवाहिकांची स्वच्छता करण्याचे काम केलेले आहे. ते कष्ट पाहता व कामातील प्रामाणिकपणा तसेच सेवाभावी वृत्ती पाहता या सफाई कर्मचाऱ्यांना मनपाच्या अन्य कर्मचाऱ्यांप्रमाणे कोव्हिड भत्ता मिळावी यासाठी रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनातील पालिका आयुक्त राजेश नार्वेकर, परिवहन व्यवस्थापक योगेश कडूस्कर आणि मुख्य लेखा वित्त विभाग अधिकारी तुषार दौंडकर यांच्याकडे सातत्याने इंटकचा नवी मुंबई विभाग व महाराष्ट्र कर्मचारी युनियनच्या माध्यमातून पाठपुरावा केला. त्यामुळेच सफाई कर्मचाऱ्यांच्या परिश्रमाला न्याय देताना जवळपास १८ लाख रुपयांचा कोव्हिड भत्ता परिवहन सफाई कर्मचाऱ्यांना वितरीत करणे पालिका प्रशासनाला भाग पडले. यामुळे कर्मचाऱ्यांनी कोव्हिड भत्ता मिळाल्याने कामगार नेते रविंद्र सावंत यांची भेट घेवून सत्कार केला. तुमच्या पाठपुराव्यामुळे कोव्हिड भत्ता मिळणे शक्य झाल्याचे सांगत परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी कामगार नेते रविंद्र सावंत यांचे आभार मानले.
किमान वेतन 2023 अधिसूचना जारी. शासनाचा महत्वपूर्णे निर्णय लाखो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा लाभ…
ओडिशातील ५७ हजार कंत्राटी कर्मचारी नियमित होणार,शासन अधिसूचना जारी….