
अनेकांचं भविष्य सांगणारा, ज्योतिष विदया अवगत असल्याचा दावा करणारा नाशिकचा भोंदू भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) याचं भविष्य अंधारात दिसत असून सध्या तो कारागृहाच्या गजाआड आहे. महिला अत्याचार, लैंगिक शोषण, फसवणूक, पैसे लुबाडणं असे अनेक आरोप त्याच्यावर आहेत. याच भोंदू अशोक खरातला भेटायला, त्याचे भक्त म्हणून अनेक नेते, राजकारणी, तसेच राज्यातले आमदराही यायचे अशी माहिती समोर येत असन याचप्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या, नीलम गोऱ्हे यांचं नावही घेऊन अनेक आरोप केले होते. काही दिवसांपूर्वी देसाईन यांनी गोऱ्हे यांच्याबद्दल अनेक विधान केली, गोऱ्हे या खरातला भेटत होत्या, कोरोना काळाच्या आधीपासून त्यांची नाशिकच्या हॉटेलात खरातशी भेट झाली, मंत्रीपदासाठी त्यांनी खरातला हातही दाखवला, असा दावा तृप्ती देसाईंनी केला होता.
मात्र त्याच दिवशी संध्याकाळी गोऱ्हे यांनी पत्रकार पपिषद घेत देसाईंचे सर्व दावे, आरोप फेटाळून लावले, मी खरातला कधीच भेटले नाही असंही गोऱ्हे म्हणाल्या. मात्र आज तृप्ती देसाई यांनी पुन्हा एक पत्रकार परिषद घेत गोऱ्हे यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्यांचा पुनरुच्चार केला. तसेच खरातप्रकरणी नीलम गोऱ्हेंच माहिती ज्यांनी दिली ते शिवसेनेचेच कार्यकर्ते होते, असाही दावा तृप्ती देसाई यांनी केला.
काय म्हणाल्या तृप्ती देसाई ?
गोऱ्हे यांच्याबाबतीत जी माहिती दिली, जे त्यांच्यासोबत खरातच्या ऑफीसमध्ये उपस्थित होते, त्यातील एक व्यक्ती नाशिकची तर दुसरी व्यक्ती पुण्यातील आहे. माझ्याकडे ज्यांनी माहिती दिली, त्यांनी सांगितलं की जोपर्यंत आम्ही एसआयटीच्या समोर किंवा त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांच्यासमोर जात नाही, तोपर्यंत आमचं नाव सांगू नका. कारण त्यांच्या कुटुंबियांवर दबाव आणला जाऊ शकतो, त्यांचं स्टेटमेंट बदलण्यासाठी त्रास दिला जाऊ शकतो. पण जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा ते पुरावे मी किंवा ते पुरावे स्वत:च समोर येतील, असं तृप्ती देसाईंनी सांगितलं.
शिंदे गटातील कुरबुरीमुळे तुमच्या खांद्याचा वापर ?
शिंदे गटातील अंतर्गत कुरबुरीमुळे तुमच्या खांद्याचा वापर झालाय का, असा सवाल देसाई यांना विचारण्यात आला.याप्रकरणात मी कुठेही अडचणीत येणार नाही, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. जे लोक आले, त्यांचं मी रेकॉर्डिंग करून घेतलं आहे, पण आत्ता पुरावे समोर आणण्यापेक्षा ते काय करतात ते बघू. जेव्हा आम्ही एसआयटीकडे किंवा त्यांच्या पक्षनेत्यांकडे जाऊ, ती लोकं तिथे येतल.
आणि शिंदे सेनेच्या लोकांकडून माझा वापर कशाला होईल, त्यांच्याकडे अनेक प्रवक्ते, नेते आहेत. नील गोऱ्हे म्हणाल्या की ठाकरे सेनेच्या दुखावले गेलेल्या लोकांनी तृप्ती देसाईंना माहिती दिली असेल, पण हे मोठे लोकं आमच्याकडे कशाला येतील? त्यांनी त्यांच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना, प्रवक्त्यांना सांगितलं असंत ना, असा युक्तीवाद देसाईंनी केला. यामध्ये जी माहिती मिळाली ती खरी आहे आणि पुरावे योग्य वेळी, योग्य ठिकाणी सादर केले जातील, असंही देसाई म्हणाल्या.