Headlines

उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर

उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर
उद्धव ठाकरे म्हणाले सरकार दगाबाज, श्रीकांत शिंदेंचा पटलवार; दोन्ही शिवसेनेचे नेते संभाजीनगर दौऱ्यावर



मुंबई : राज्यातील अतिवृष्टीनंतर राज्य सरकारने 31 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केलं असून बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही मदत जमा देखील झाली. मात्र, काही शेतकऱ्यांना अद्यापही मदत मिळाली नाही. त्याच पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारची मदत अपुरी असल्याचे सांगतात महायुती सरकारवर टीका केली आहे. शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारला “दगाबाज रे..” म्हणत आजपासून सलग 4 दिवसांचा मराठवाडा दौरा सुरू केला आहे. त्यामध्ये, ते छत्रपती संभाजीनगरलाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी, आज शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांनी छत्रपती संभाजीनगर (Sambhajinagar) दौऱ्यात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरुन टीका केली.

मराठवाड्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना पुन्हा उद्धव ठाकरे भेटी देणार आहेत, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ते संवाद साधणार आहेत. सरकारने दिलेल्या पॅकेजचे काय झालं? शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली किती रक्कम शेतकऱ्यांपर्यंत खरंच पोहोचली का? 31 हजार कोटींचा पॅकेज जाहीर करून प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या हातात महिनाभर नंतर किती पैसे आले? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहेत. याच संदर्भात खासदार श्रीकांत शिंदे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केला.

हे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा यांनी शेतकऱ्यांना काय दिलं? ओला दुष्काळ झाला तेव्हा 36 हजार रुपयांचे पॅकेज या सरकारने दिले. या अगोदर देखील एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून मदत देण्याचं काम आमच्या सरकारनेच केलं. ज्यांनी काहीच केलं नाही ते आज शेतकऱ्यांना येऊन बोलत आहेत, त्यांना बोलू द्या. शेतकऱ्यांना माहिती आहे, त्यांच्याबरोबर कोण उभे आहे, असे श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. तसेच, शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ मिळाला त्यामुळे विधानसभेला शेतकरी आमच्या मागे उभे राहिले. म्हणून महायुती सरकार पुन्हा निवडून आले. या दौऱ्याबद्दल काय म्हणायचं हे त्यांना विचारा. शेतकऱ्यांची फसवणूक केली ही उद्धव ठाकरेंची कॅसेट जुनी झाली, तीच रटाळ कॅसेट, तेच टेप लोकांना दररोज ऐकण्यामध्ये इंटरेस्ट नाही, असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरेंचा दौरा निवडणुकीसाठी

मराठवाड्यात शेतकरी नुकसान झाले महायुती सरकारने मदत ही केली, उद्धव साहेबांचा हा दौरा निवडणुकीसाठी आहे. त्यांचा दौरा आला की निवडणूक लागल्या म्हणायच्या, या आधी लोकसभा, विधानसभेला त्यांनी असंच केलं. ते आम्हाला दगाबाज ते म्हणू शकतात. मात्र, शेतकऱ्याला आम्ही मदत केली आहे, थोडा उशीर झाला पण मदत मिळाली, अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संदीपान भुमरे यांनी दिली.

महायुती म्हणून आम्ही एकत्र

महायुतीची निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. आमची शिवसेनेची देखील तयारी सुरू असून बैठका होत आहेत. आज वैजापूर, दहिसरमध्ये पक्षाचा कार्यक्रम आहे. कालच निवडणुका जाहीर झाल्या, पहिल्या नगरपालिका, नंतर जिल्हा परिषद निवडणुका होतील, या निवडणुकीमध्ये देखील जसे यश विधानसभेला मिळाले होते, तसेच यश आम्हाला मिळेल, असेही श्रीकांत शिंदे यांनी म्हटले. महायुती म्हणून आज आम्ही एकत्र आहोत. जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार, काही स्थानिक पातळीवर वेगळी परिस्थिती असेल तिथं विचार करून निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा

सरकारची 3500 जागांसाठी जाहिरात, एनटी प्रवर्गासाठी एकही जागा नाही; धनंजय मुंडेंचा संताप, आरोग्यमंत्र्यांना पत्र

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *