
Uddhav Thackeray on BJP : भाजप कारस्थान करणारा पक्ष, उद्धव ठाकरेंची टीका
काहीजण आपल्यातून निघून गेली आहे ते आता परत आले डोंबिवलीतून भाजपचे काही लोक आपल्या पक्षासोबत आले आहेत
थोडक्यात काय भाजप आणि गद्दार हे किती ढोंगी आहेत हे लोकांना कळायला लागला आहे
तुम्ही जोशात आलात पण आता डोळे उघडे ठेवून सगळं बघा
भाजपा पक्ष कपटकारस्थान करणारा पक्ष आहे.. ज्या पद्धतीने भाजपने पक्ष फोडले त्या पद्धतीने आता घर फोडायला सुद्धा बघतायेत
हिंदुत्वाचा फुगा आता त्यांचा फुटला आहे
पालघर मध्ये जे साधू हत्याकांड झालं ज्यावेळी भाजपने ज्याच्यावर आरोप केले होते त्यालाच पक्षात प्रवेश दिला
त्यांना वाटलं आपलं हे पाप झाकून जाईल पण चव्हाट्यावर आल्यानंतर त्यांनी पक्षप्रवेश स्थगित केला
आता भाषिक प्रांत करायला ते लागले आहेत काल परवाची घटना दुर्दैवी घडली ती घडला नको होती
भाषेसाठी कोणी कोणाचा खून करा त्याला मारा मात्र कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवर अत्याचार करू नये.. हा भाषिक प्रांतवाद सुरू झाला कुठून
मागाठाण्याचा तुमचा आमदार म्हणाला मराठी माझी आई आहे ती मेली तरी चालेल… असा जर राग यांच्या मनात असेल तर यांच्याकडून अपेक्षा काय करायची
घाटकोपरमध्ये संघाचे जोशी येऊन गेले… माझी मातृभाषा गुजराती आहे म्हणाले हे विष जे आहे ते भाजप आणि संघ पसवरत आहे आणि त्याचा खापर आपल्यावर फोडत आहे
तोडा फोडा आणि राज्य करा असं त्यांना करायचा आहे मात्र यातून आपल्या भूमिपुत्रांना आपल्याला सांभाळायचं आहे
तुम्हाला वाटलं की ही काम फक्त शिवसेनाच करू शकेल याबद्दल आनंद झाला जेव्हा मनगटात हिम्मत असते तेव्हा विजय दूर नसतो