Headlines

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दीपोत्सवानंतर पुन्हा राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ येथे दाखल, कारण समोर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दीपोत्सवानंतर पुन्हा राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ येथे दाखल, कारण समोर
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे दीपोत्सवानंतर पुन्हा राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ येथे दाखल, कारण समोर



मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थ येथे दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या आठवड्यात पुन्हा दाखल झाले आहेत. राज ठाकरे यांच्या आई मधुवंती ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थ येथे दाखल झाले आहेत.  ही दोन्ही पुन्हा एकदा कौंटुबिक भेट आहे. उद्धव ठाकरे आज त्यांच्या मावशी आणि काकी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवतीर्थ येथे आले आहेत. 

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील ही गेल्या काही दिवसांमधील आठवी भेट आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मराठीच्या मुद्यावर 5 जुलै रोजी एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठकारे अनेकदा दोघेजण भेटल्याचं पाहायला मिळालं आहे. राज ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले होते. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी अद्याप राजकीय युतीची घोषणा केलेली नसली तरी कौटुंबिक भेटी सुरु राहतील असं पाहायला मिळतं.  

आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या संदर्भात विविध चर्चा सुरु आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या मनसेकडून अद्याप राजकीय युतीची घोषणा करण्यात आलेली नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला इशारा दिला होता. मतदार यादीच्या मुद्यावर  मनसे आणि महाविकास आघाडीतील पक्ष एकत्रितपणे 1 नोव्हेंबरला मोर्चा काढणार आहे.

उद्धव ठाकरेंच्या हस्ते दीपोत्सवाचं उद्धघाटन

मनसेकडून मुंबईतील शिवाजी पार्क येथे दरवर्षी दिवाळीनिमित्त दीपोत्सवाचं आयोजन करण्यात येतं.  यंदाच्या दीपोत्सवाचं उद्घाटन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. या दीपोत्सवाच्या उद्घाटनाला दोन्ही ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर काहीच दिवसात उद्धव ठाकरे पुन्हा एकदा शिवतीर्थवर दाखल झाले आहेत. 

मतदार यादीच्या मुद्यावर दोन्ही ठाकरे एकत्र

राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात मतदार यादीच्या मुद्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर दादरच्या शिवसेना भवनमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि मनसेच्यावतीनं पत्रकार परिषद घेण्यात आली होती.  त्यावेळी संजय राऊत यांनी मतदार यादीतील घोळासंदर्भात मुंबईत सर्वपक्षीय मोर्चा 1 नोव्हेंबरला काढणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. आता येत्या 1 नोव्हेंबरला दोन्ही ठाकरे मोर्चात एकत्र पाहायला मिळू शकतात. 

हेदेखील वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *