Headlines

Uddhav Thackerays Birthday: उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसासाठी राज ठाकरे मातोश्रीवर निघाले; महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी

Raj Thackeray and Uddhav Thackeray: काही दिवसांपूर्वी मराठी मेळाव्याच्यानिमित्ताने एकत्र आल्यानंतर ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत. आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणार आहेत. काहीवेळापूर्वीच राज ठाकरे हे दादरमधील आपल्या निवासस्थानावरुन मातोश्रीकडे रवाना झाल्याची माहिती आहे. राज ठाकरे हे मातोश्रीवर जाणे हा अनेक अर्थांनी ऐतिहासिक क्षण मानला जात आहे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे काही निवडक प्रसंग सोडले तर ते मातोश्रीवर गेले नव्हते. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे हे जेव्हा जेव्हा मातोश्रीवर गेले होते, तेव्हा काहीतरी अपरिहार्य कारण होते. मात्र, आता राज ठाकरे हे पहिल्यांदाच स्वखुशीने मातोश्रीवर जाणार आहेत.

राज ठाकरे हे शिवसेनेत असताना अनेकदा मातोश्रीवर जायचे. राज ठाकरे हे लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिले होते. त्यांच्याच मुशीत राज ठाकरे यांची जडणघडण झाली होती. त्यामुळे राज ठाकरे हे अनेकदा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मातोश्रीवर असायचे. मात्र, शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरे आणि मातोश्रीची ताटातूट झाली होती. मात्र, आता राज ठाकरे हे अनेक वर्षांनी मातोश्रीवर पाऊल ठेवणार आहेत. हा महाराष्ट्रातील राजकारणाच्या नव्या अध्यायाचा श्रीगणेशा ठरण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *