Headlines

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं

उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं
उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौरा ठरला, राहुल गांधींकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण; राजधानीत राजकीय खलबतं


मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा (Election) मार्ग मोकळा झाला असून लवकरच बिगुल वाजणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांकडून निवडणुकांची रणनीती आखायला सुरुवात केली आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांच्या निकालापासून एकही बैठक न झालेल्या इंडिया आघाडीची आता बैठक होत आहे. या बैठकीसाठी शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दिल्लीला जाणार आहेत. एकीकडे मनसे-शिवसेना युतीची चर्चा सुरू असताना दुसरीकडे ठाकरेंची दिल्लीवारही चर्चेत आहे.  उद्धव ठाकरे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्लीत पोहचणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे राहुल गांधी (Rahul gandhi) यांच्या निवासस्थानी भोजनाचे आमंत्रण देखील ठाकरेंना असल्याची माहिती आहे. 

उद्धव ठाकरे यांचा दिल्ली दौरा आणि इंडिया आघाडी बैठक निश्चित झाली असून 6 तारखेला ते दिल्लीत पोहोचणार आहेत. त्यानंतर 7 तारखेला होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होईल. त्याशिवाय, सध्या पावसाळी अधिवेशनानिमित्ताने दिल्लीत असलेल्या शिवसेना पक्षाच्या खासदारांची सुद्धा उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यात बैठक घेणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधीकडून इंडिया आघाडीच्या बैठकीसोबतच स्नेहभोजनाचा सुद्धा निमंत्रण उद्धव ठाकरे यांना देण्यात आलं आहे. त्यामुळे, राहुल गांधी यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे स्नेहभोजनाला जाणार असल्याची देखील माहिती आहे.  

महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडीच्या इतर राज्यातील सर्व प्रमुख नेत्यांना सुद्धा इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण दिले असल्याची माहिती आहे. सध्या संसदेचं अधिवेशन सुरू असल्याने इंडिया आघाडीतील सर्वच प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहतील. इंडिया आघाडीतील जे सर्व महत्त्वाचे नेते  बैठकीला उपस्थित राहणार आहेत, त्यांना स्नेहभोजनाचा निमंत्रण राहुल गांधी यांचे निवासस्थानी असणार आहे. 

बैठकीत काय होईल चर्चा

राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन करून इंडिया आघाडीच्या बैठकी संदर्भात निमंत्रण दिले आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी काहींना फोन करून तर काहींना संसदेच्या अधिवेशनातदरम्यान प्रत्यक्ष भेटून इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी निमंत्रण दिले आहे. आगामी काळात इंडिया आघाडीच्या रणनीती संदर्भात चर्चा, स्थानिक निवडणुकांवर चर्चा होणार आहे. तसेच, प्रामुख्याने मतदार यादीतील घोळ, बिहार निवडणूक, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक व इतर राष्ट्रीय मुद्द्यांवर इंडिया आघाडीची एकवाक्यता राहण्यासाठीची चर्चा या बैठकीत होणार असल्याची माहिती आहे. 

हेही वाचा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *