Headlines

Us, Iran, Israel war : युद्धात डोनाल्ड ट्रम्प जिंकले; इराणवर आभाळ कोसळलं, युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी

Us, Iran, Israel war : युद्धात डोनाल्ड ट्रम्प जिंकले; इराणवर आभाळ कोसळलं, युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी
Us, Iran, Israel war : युद्धात डोनाल्ड ट्रम्प जिंकले; इराणवर आभाळ कोसळलं, युद्धभूमीतून सर्वात मोठी बातमी


अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये भीषण युद्ध सुरू आहे. आज या युद्धाचा 18 वा दिवस आहे. या युद्धामध्ये इराणचं प्रचंड नुकसान झालं आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सातत्यानं हल्ले सुरूच आहेत. युद्धाच्या 18 व्या दिवशी मोठी बातमी समोर आली आहे. इराणला प्रचंड मोठा धक्का बसला आहे. 28 फेब्रुवारी रोजी इस्त्रायलने इराणवर हल्ला केला होता आणि भीषण युद्धाला सुरुवात झाली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी एक मार्च रोजी अमेरिका आणि इस्त्रालयने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. दरम्यान अयातुल्ला अली खामेनेई नंतर इराणच्या नंबर दोनच्या सर्वात पावरफूल नेत्याला आता इस्त्रायल आणि अमेरिकेकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंगळवारी इस्त्रायल आणि अमेरिकेनं अली लारिजानी ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणावर एअर स्ट्राईक केला आहे.

अली लारिजानी नेमके इराणमध्ये कुठे आहेत, याची गुप्त माहिती इस्त्रायलला मिळाली होती. त्यानंतर इस्त्रायलने अली लारिजानी यांच्या ठिकाणांवर हल्ला केला. इस्त्रायलकडून एअरस्ट्राईक करण्यात आला आहे. या हल्ल्यमधून अली लारिजानी वाचले की त्यांचा मृत्यू झाला? याबाबत इराणकडून कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. आता अली लारिजानी याचां मृत्यू झाला की नाही याबाबत इस्त्रायल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. इस्त्रायलला अशी माहिती मिळाली होती की, अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर लारिजानी हेच इराणच्या बाजूनं या युद्धाचं नेतृत्व करत होते. लारिजानी हे इराणच्या सुरक्षा पदरिषदेचे सचिव आहेत.

दरम्यान टाइम्स ऑफ इस्त्रायलने दिलेल्या माहितीनुसार लारिजानी यांच्यावर एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. या एअर स्ट्राईकमध्ये लारिजानी यांचा मृत्यू झाला आहे की ते वाचले आहेत? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र दुसरीकडे इराणला मोठा दणका बसला आहे, तो म्हणजे इराणच्या बासिज फोर्सचे प्रमुख असलेल्या गुलाम रजा सुलेमानी यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. बासिज फोर्स हे इराणमधील सर्वात मोठी सरकारी संघटना असून, प्रशासकीय स्तरावरील सर्व निर्णय हीच संघटना घेते.

दरम्यान या हल्ल्यात जर अली लारिजानी यांचा मृत्यू झाला असेल तर हा इराणसाठी सर्वात मोठा धक्का आहे. कारण अयातुल्ला अली खामेनेई यांच्या नंतर मोजतबा खामेनेई यांना इराणचे सर्वोच्च नेते बनवण्यात आलं आहे. मात्र ते देखील युद्धात जखमी झाल्याची माहिती आहे. अली लारिजानी हे अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या दिवसापासून एकहाती या युद्धाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे आता जर या एअर स्ट्राईकमध्ये त्यांचा मृत्यू झाला असेल तर हा इराणसाठी सर्वात मोठा धक्का आहे. हा अमेरिका आणि इस्त्रायलचा एका दृष्टीने मोठा विजय आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *