US-Israel Iran News LIVE : युएईमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा हल्ला

US-Israel Iran News LIVE : युएईमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा हल्ला
US-Israel Iran News LIVE : युएईमधील अमेरिकन दूतावासावर इराणचा हल्ला


  • 04 Mar 2026 01:20 PM (IST)

    युद्धजन्य परिस्थितीचा सांगलीतल्या द्राक्ष उत्पादक व्यापाऱ्यांना फटका

    इराण-इजराईल युद्धा मुळे आखाती देशात निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका सांगली जिल्ह्यातील द्राक्षांना बसला आहे. तब्बल साडेतीनशे कंटेनर द्राक्ष सध्या सांगलीच्या कोल्ड स्टोअरेज मध्ये आहे. तर 700 हुन अधिक कंटेनर इतका द्राक्ष हे बागेत आहेत. त्याच बरोबर मुंबईच्या बंदरात 300 कंटेनर थांबून आहेत. त्यामुळे जवळपास 15 हजार टन इतके द्राक्षे आखाती देशात जाण्यापासून थांबले आहेत.

  • 04 Mar 2026 01:08 PM (IST)

    पुण्यातील रामेश्वर कॅफेवर महानगरपालिकेची कारवाई

    देशभरात चर्चेत असलेले रामेश्वर कॅफे याची एक शाखा काही महिन्यांपूर्वी पुण्यात सुरू करण्यात आली होती. मात्र, या पुणे शाखेबाहेर महानगरपालिकेच्या जागेवर बाकडे ठेवून ग्राहकांना बसून खाण्याची परवानगी देण्यात आली होती. ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महानगरपालिकेने कारवाई करत संबंधित अतिक्रमणावर हातोडा चालवला. कॅफेसमोरील अनधिकृत बाकडे व साहित्य हटवून परिसर मोकळा करण्यात आला आहे.

  • 04 Mar 2026 12:40 PM (IST)

    राज ठाकरेंनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

    राज ठाकरेंनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक….शिवतीर्थ निवासस्थानी बैठकीचं आयोजन….मनसेच्या वर्धापन दिन संदर्भात बैठक असल्याची माहिती….राज ठाकरे स्वतः पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार….

  • 04 Mar 2026 12:30 PM (IST)

    विलीनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबली आहे- जयंत पाटील

    अजितदादांच्या निधनानंतर विलिनीकरणाची चर्चा आता पूर्णपणे थांबली… विलिनीकरणाच्या होत असलेल्या चर्चांवर पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची प्रतिक्रिया…

  • 04 Mar 2026 12:20 PM (IST)

    अजित पवार हयात असताना तटकरेंविरोधात काहींची नाराजी?

    अजित पवार हयात असताना तटकरेंविरोधात काहींची नाराजी?… राष्ट्रवादीच्या विविध सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे दिले होते…. पण अजितदादांनी हे राजीनामे फेटाळले होते… सूत्रांची टीव्ही नाईन मराठीला माहिती… नंतर दादांच्या निधनानंतर राजीनामे कारणे न विचारताच मंजूर… सूत्रांची माहिती….

  • 04 Mar 2026 12:10 PM (IST)

    ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर राऊत ‘शिवतीर्थ’वर

    ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत ‘शिवतीर्थ’वर… संजय राऊतांनी राज ठाकरेंची भेट घेतली… राज ठाकरेंशी चर्चा करून संजय राऊत शिवतीर्थवरून निघाले…

  • 04 Mar 2026 11:59 AM (IST)

    राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर

    राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवार यादी जाहीर. रामदास आठवले, विनोद तावडे यांना पुन्हा संधी. माया चिंतामण ईवानाते, रामराव वडकुते यांना उमेदवारी जाहीर. महाराष्ट्रातून भाजपकडून चार उमेदवारांची नावं जाहीर.

  • 04 Mar 2026 11:47 AM (IST)

    राज्यसभेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही – जयंत पाटील

    “राज्यसभेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. राज्यसभेचा उमेदवार एकत्र चर्चा करुन ठरवणार. शरद पवार दिल्लीत असावेत अशी आमची इच्छा आहे. मविआ एकत्र बसून राज्यसभेबाबत निर्णय घेणार आहे” असं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील म्हणाले.

  • 04 Mar 2026 11:40 AM (IST)

    संजय राऊत शिवतीर्थवर दाखल

    ठाकरे बंधुंच्या युतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे. त्यानंतर या दोन बंधुंमधील दुवा मानले जाणारे संजय राऊत लगेच शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

  • 04 Mar 2026 11:21 AM (IST)

    व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड का केलं? रोहित पवार

    व्हिजीबिलीटी नसताना विमान लँड करायचं नाही, असं त्यागी समितीने म्हटलं आहे. तरीही लँड करण्यात आलं. अॅरो नावाच्या ग्रुपमध्ये सिव्हिल एव्हिएशन गव्हर्मेंट आणि सरकारी अधिकारी होते. त्यामुळे अॅरो नावाच्या ग्रुपमधील सर्वांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. एफआयआरमध्ये अॅरोमधील अधिकाऱ्यांचे नाव आलं पाहिजे.

  • 04 Mar 2026 11:17 AM (IST)

    अपघातापूर्वी विमानतळाची रेकी झाली होती

    काही लोकांच्या मते विमानतळाची रेकी झाली होती. अपघातापूर्वी रेकी झाली होती. याची आम्हाला पक्की माहिती नाही. पण त्या अँगलने चौकशी झाली पाहिजे. कालच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव दिलेलं नाही असं रोहित पवार म्हणाले.

  • 04 Mar 2026 11:15 AM (IST)

    रिपोर्टमध्ये बेसिक निरीक्षण चुकीचं

    हा व्हिडिओ पाहिल्यावर राईट बँक झालं नव्हतं. तर लेफ्टला पडलं होतं. रिपोर्टमध्ये बेसिक गोष्ट चुकली आहे. गोळी कुठे लागली, डोक्यात की पोटात लागली हे चुकीचं सांगितलं तर कसं होईल. या रिपोर्टमध्ये तेच चुकलं. या रिपोर्टमध्ये बेसिक निरीक्षण चुकीचं आहे असं रोहित पवार म्हणाले.

  • 04 Mar 2026 11:11 AM (IST)

    झाडाला विमान धडकलं हे चुकीच आहे – रोहित पवार

    AAIB च निरीक्षण चुकलय असं आमचं सर्वांच मत आहे. चर्चा एका झाडाची आहे. रिपोर्टमध्ये ट्री सांगितलेत. विमान किती झाडांना अडकून खाली कोसळलं. झाडं नाही झुडूप आहे. झुडूपाला विमान टच सुद्धा झालं नव्हतं. झाडाला विमान धडकलं हे चुकीच आहे. रिपोर्ट द्यायचा म्हणून दिला असं रोहित पवार म्हणाले.

  • 04 Mar 2026 11:08 AM (IST)

    मी VSR किंवा DGCA च्या विरोधात नाही – रोहित पवार

    “मी VSR किंवा DGCA च्या विरोधात नाही. VSR कंपनीला कोणीतरी वाचवतय अशी शंका. DGCA तील अधिकाऱ्यांनाही कोणी वाचवतय का? रनवे 29 सेफ होता. तो दोनदा कॅन्सल केला. विमान आधी सूरतला गेलं होतं, हे अहवालात आलय” असं रोहित पवार म्हणाले.

  • 04 Mar 2026 10:56 AM (IST)

    जळगाव – महामार्गालगत असलेल्या सावन हॉटेलला भीषण आग

    जळगावातील नशिराबाद येथे महामार्गालगत असलेल्या सावन हॉटेलला भीषण आग लागली. मात्र  कामगारांनी हॉटेलमधले 5-6 सिलेंडर वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.  शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.  जळगाव व नशिराबाद येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवलं, मात्र हॉटेलमधील साहित्याचे मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 04 Mar 2026 10:44 AM (IST)

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज

    शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. ते सिल्व्हर ओक या निवासस्थानी पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते.

  • 04 Mar 2026 10:41 AM (IST)

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बोलावली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक

    मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. शिवतीर्थ निवासस्थानी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं असून वर्धापन दिनासंदर्भात ही बैठक असल्याचं समजतं.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

  • 04 Mar 2026 10:31 AM (IST)

    छत्रपती संभाजी नगर मध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी वाढली

    छत्रपती संभाजी नगर मध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची गर्दी वाढली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार, पेट्रोल डिझेल बंद होणार अशा अफवा पसरल्याने पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे.

  • 04 Mar 2026 10:16 AM (IST)

    पार्थ पवार राज्यसभेसाठी उद्या भरणार अर्ज

    पार्थ पवार हे राज्यसभेसाठी उद्या अर्ज भरणार आहेत.  तर मविआकडून शरद पवार यांचाही उद्या उमेदवारी अर्ज भरला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

  • 04 Mar 2026 10:06 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित…

    पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित करण्यात आली आहे.  युएई गव्हर्नमेंट केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून कालच्या फ्लाईटमधून विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक भारतात परतले.

    नेमक्या भारतीय प्रवाशांची माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या टुरिस्ट कंपन्याकडून डेटा गोळा करण्यात आला आहे.

  • 04 Mar 2026 09:58 AM (IST)

    टीव्ही 9 च्या बातमीनंतर परभणी जिल्ह्यातील पेट्रोल पंपावरील गर्दी झाली कमी, जिल्ह्यात पुरेसा साठा उपलब्ध

    आखाती देशात युद्ध सुरू असल्याने पेट्रोल मिळणार नसल्याची अफवा परभणी जिल्ह्यात पसरली होती. अफवा पसरल्याने वाहन धारकांनी पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली होती. बाटली, कॅनमधून वाहनधारक पेट्रोलचा साठा करत होते. टीव्ही 9 च्या बातमीनंतर पेट्रोल पंपावरील गर्दी कमी झाली. जिल्हधिकाऱ्यांच्या आदेशानंतर बाटली, कॅनमध्ये पेट्रोल, डिझेल देणं बंद झालं. जिल्ह्यात पेट्रोलचा पुरेसा साठा असून आज सगळे पेट्रोल पंप सुरू राहणार आहेत.

  • 04 Mar 2026 09:50 AM (IST)

    युएईमधल्या अमेरिकन दूतावासावर इराणकडून हल्ला

    इराणने युएईमधल्या अमेरिकन दूतावासावर हल्ला केला असून दूतावासाच्या आत एका मोठ्या स्फोटामुळे आग लागली आहे. अमेरिका आणि इस्रायलचा इराणवर बॉम्बहल्ला आजही सुरू आहे. तेहरानमधील आयआरजीसी तळांवर हल्ले करण्यात आले आहेत.

  • 04 Mar 2026 09:35 AM (IST)

    अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम जळगाव जिल्ह्यातील केळींवर

    अमेरिका-इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा मोठा परिणाम जळगाव जिल्ह्यातील केळींवर देखील झाला आहे. युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातले 100 पेक्षा अधिक केळीचे कंटेनर हे जीएनटीपी या ठिकाणी अडकलेले आहेत. रमजान महिन्यांमध्ये तब्बल दररोज 10 ते 12 कंटेनर केळी आखाती देशांमध्ये निर्यात होत असतात. मात्र युद्धामुळे निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. या महिन्यांमध्ये केळीला अडीच हजार रुपयांपर्यंत दर मिळत होता, मात्र युद्धामुळे दर घसरले असून केवळ हजार ते पंधराशे रुपये पर्यंत आता दर मिळत आहे. निर्यात ठप्प झाल्याबरोबरच दुसरीकडे केळीचे दर देखील घसरल्याने केळी उत्पादक शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाचा सामना करावा लागतोय.

  • 04 Mar 2026 09:25 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित

    पुणे जिल्ह्यातील दुबईत अडकलेल्या सर्व लोकांची माहिती राज्य सरकारकडून संकलित करण्यात आली आहे. युएई गव्हर्नमेंट, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा समन्वय करून भारतात परतण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कालच्या फ्लाइटमध्ये विद्यार्थी आणि मुंबईतील काही नागरिक भारतात परतले आहेत. नेमक्या भारतीय प्रवाशांची माहिती होण्यासाठी वेगवेगळ्या टुरिस्ट कंपन्याकडून डेटा गोळा करण्यात आला आहे.

  • 04 Mar 2026 09:15 AM (IST)

    पुण्यातील 50 प्रवासी दुबईमधून परतले असून  अडकलेल्या इतर प्रवाशांनाही लवकरात लवकर आणलं जाणार

    पुण्यातील 50 प्रवासी दुबईमधून परतले असून  अडकलेल्या इतर प्रवाशांनाही लवकरात लवकर आणलं जाणार आहे. इस्रायल- इराण- अमेरिका युद्धामुळे दुबईत अनेक प्रवासी अडकले आहेत. पुणे महापालिकेकडून मदत कक्ष सुरू करण्यात आलंय. आतापर्यंत 170 जणांनी संपर्क केल्याची माहिती आहे. महापालिकेकडून गोळा झालेली माहिती जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार देण्यात आली आहे. महापौर मंजुषा नागपुरे यांनी महापालिकेत मदत कक्ष उभा करून नागरिकांनी घाबरून न जाता संपर्क करण्याचा आवहान केलंय.

  • 04 Mar 2026 09:05 AM (IST)

    31 मार्चपासून नांदेड – गोवा आणि नांदेड – नागपूर विमानसेवा सुरू

    31 मार्चपासून नांदेड – गोवा आणि नांदेड – नागपूर विमानसेवा सुरू होणार आहे. 29 मार्चपासून नांदेड – बंगळुरू विमानसेवाही प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. नांदेड विमानतळावरून आठ शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध असेल. भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी X वर पोस्ट करत माहिती दिली.

  • 04 Mar 2026 08:50 AM (IST)

    सर्वात सुरक्षित दुबईवर पहिल्यांदाच मोठा हल्ला..

    सर्वात सुरक्षित दुबईवर पहिल्यांदाच मोठा हल्ला. पहिल्यांदात दुबईवर एका मागून एक मोठी हल्ले. थेट खळबळ.

  • 04 Mar 2026 08:40 AM (IST)

    दुबईतील अमेरिकन दूतावावर हल्ला

    दुबईतील अमेरिकन दूतावास कार्यालयावर अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याने अत्यंत मोठी खळबळ उडाली.

  • 04 Mar 2026 08:30 AM (IST)

    तेहरानच्या विमानतळावर मोठा हल्ला

    इराणी मीडियाने दावा केला की, तेहरानच्या विमानतळावर इराणकडून अत्यंत मोठा हल्ला करण्यात आला. तेहरानवरील हल्ल्याचा व्हिडीओ देखील पुढे आला.

  • 04 Mar 2026 08:28 AM (IST)

    अमेरिका स्पेनसोबत सर्व व्यापार संबंध तोडणार

    इराणसोबच्या युद्धादरम्यान अमेरिकेने मोठी घोषणा केली असून अमेरिकेने म्हटले की, स्पेनसोबतचे सर्व व्यापार संबंध तोडणार आहे.

  • 04 Mar 2026 08:27 AM (IST)

    इराणकडून अमेरिकेच्या किनरवर मोठा हल्ला

    इराणकडून अमेरिकेच्या किनरवर मोठा हल्ला. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. अमेरिकेनेही इराणच्या प्रमुख ठिकाणांवर मोठे हल्ले केले.



  • Source link

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *