Headlines

Us, Israel, Iran War : इराणचा अमेरिकेला मोठा धक्का, नव्या निर्णयाने जग हादरलं, आता ट्रम्प काय करणार?

Us, Israel, Iran War : इराणचा अमेरिकेला मोठा धक्का, नव्या निर्णयाने जग हादरलं, आता ट्रम्प काय करणार?
Us, Israel, Iran War : इराणचा अमेरिकेला मोठा धक्का, नव्या निर्णयाने जग हादरलं, आता ट्रम्प काय करणार?


इराणने अमेरिकेला मोठा धक्का दिला आहे, इराणने अमेरिकेचा 15 सूत्रांचा शांती प्रस्ताव फेटाळून लावला आहे. याबाबत इराणच्या सरकारी मीडियाला तेथील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली आहे. आता आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हाच आम्ही हे युद्ध थांबवू असं या उच्चपदस्थ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. तर अन्य एका अधिकाऱ्यांनी अमेरिकेच्या या प्रस्तावावर बोलताना म्हटलं की, अमेरिकेच्या या प्रस्तावावर आम्ही सकारात्मक नाही आहोत. समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेने पाकिस्तानच्या माध्यमातून हा प्रस्ताव इराणसमोर मांडला होता.

अमेरिकेच्या प्रस्तावावर इराणचा संताप

याबाबत बोलताना इराणच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, आम्ही या प्रस्तावावरची आमची पहिली प्रतिक्रिया पाकिस्तानला दिली आहे. पाकिस्तान आमचं म्हणणं अमेरिकेपर्यंत पोहोचवेल. अमेरिकेचा हा प्रस्ताव आम्हाला कधीही मान्य होणार नाही, तो कागदावर वाचताना देखील बरोबर वाटत नाही, ज्या अटी मान्य होणारच नाहीत अशा अटी या प्रस्तावामध्ये असल्याचं इराणच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

काय आहेत इराणच्या पाच अटी?

इराणने अमेरिकेचा युद्धविरामाचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, तसेच अमेरिकेसमोर आपल्या पाच अटी ठेवल्या आहेत. त्यामध्ये पहिली आणि सर्वात महत्त्वाची अट म्हणजे इराणवर होणारे सर्व प्रकारचे हल्ले तातडीने थांबवावेत. दुसरी अट आम्हाला अशी गॅरंटी द्यावी की भविष्यात पुन्हा आमच्यावर कधीही हल्ला होणार नाही. तिसरी अट आमचं युद्धात जेवढं नुकसान झालं आहे, त्याची आम्हाला पूर्णपणे नुकसान भरपाई मिळावी. चौथी अट सर्व स्थरावर एकदाच युद्ध बंदीची घोषणा करावी. स्ट्रेट ऑफ होर्मूजवर आमचाच पूर्ण अधिकार राहील याला मान्यता अशा पाच अटी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत.

दरम्यान अमेरिकेने इराणला युद्धविरामाचा प्रस्ताव देऊन देखील इराणने तो अमान्य केला आहे, त्यामुळे आता अमेरिका आणि इस्त्रायलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. इराणने युद्धबंदीचा प्रस्ताव फेटाळल्यामुळे ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं असून, अमेरिका काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र हे युद्ध जर असंच सुरू राहिलं तर याचा फार मोठा फटका हा जगाला बसण्याची शक्यता आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *