
सर्व सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये राष्ट्रगान ‘जन, गण, मन’ च्या आधी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’चं गायन बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने बुधवारी सकाळी वंदे मातरम् संबंधी नवीन नियम जारी केले आहेत. नव्या नियमानुसार वंदे मातरम् लागल्यानंतर सर्व लोकांना जागेवर उठून उभं रहावं लागेल. पद्म अवॉर्ड सारख्या नागरी पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपतींच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळी राष्ट्रगीत लावावं लागेल. सिनेमा हॉल सारख्या सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत ‘वंदे मातरम्’ वाजवावं लागेल. वंदे मातरम् मध्ये सर्व सहा कडवी वाजवावी लागणार आहेत. 1937 साली काँग्रेसने हटवलेल्या चार कडव्यांचाही समावेश करण्यात आलाय.
वंदे मातरम् संबंधी केंद्र सरकारच्या या नव्या नियमांना MIM चे दिल्ली प्रदेशाध्यक्ष आणि इंडिया मुस्लिम फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ शोएब जमई यांनी विरोध केला आहे. त्यांनी सोशल मिडिया एक्सवर पोस्ट करुन म्हटलय की, “वंदे मातरम् राष्ट्र गीत नाहीय तसच ते संविधानाचा भागही नाहीय. लोक आपल्या आस्थेने मर्जीने गायचे. पण भाजप आणि RSS ने या गीताला प्रोपेगेंडा बनवलय. त्यांना जबरदस्ती आमच्यावर लादायचं आहे. मग ऐका, आमच्या मानेवर सुरी ठेवली तरी आम्ही नाही गाणार” केंद्र सरकारने राज्य आणि दुसऱ्या सरकारी संस्थांना दिलेल्या निर्देशानुसार, कुठल्याही सरकारी कार्यक्रमात राष्ट्रगान जन गण मनच्या आधी राष्ट्र गीत वंदे मातरम् च गायन करावं लागेल.
निर्देश काय आहेत?
बंकिम चंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं वंदे मातरम् हे राष्ट्र गीत म्हणून मानलं जातं. राष्ट्रपतींच्या येण्या-जाण्याच्यावेळी, औपचारिक सरकारी कार्यक्रमात, राष्ट्रपतींनी ऑल इंडिया रेडिओ आणि टेलीविजनवरुन देशाला संबोधित करण्याच्या आधी आणि नंतर राज्यपाल किंवा लेफ्टिनेंट राज्यपाल येण्या-जाण्याच्यावेळी, राष्ट्रीय परेडमध्ये वंदे मातरम् गायन करावं असे निर्देश दिले आहेत.
वंदे मातरम ना राष्ट्रीयगान है और ना ही संविधान का हिस्सा. लोग अपनी आस्था के अनुसार मर्जी से गाते थे.मगर भाजपा RSS ने इस गीत को प्रोपेगेंडा बना दिया. वह हम पर जबरन इसे थोपना चाहते हैं.
तो फिर सुनो,हमारी गर्दन पर छुरी भी रख दोगे तब भी हम नहीं जाएंगे.— Dr. Shoaib Jamai (@shoaibJamei) February 11, 2026
शाळांसाठी काय नियम?
सर्व शाळांमध्ये दिवसाची सुरुवात राष्ट्र गीताच्या सामूहिक गायनाने करता येऊ शकते. तसचं विद्यालय व्यवस्थापनाने राष्ट्र गीत आणि राष्ट्र गान लोकप्रिय करण्यासाठी तसच विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय ध्वजाप्रती सन्मानाची भावना विकसित करण्यासाठी पर्याप्त व्यवस्था करावी. औपचारिक नसलेल्या प्रसंगी सुद्धा तुम्ही राष्ट्र गीत गाऊ शकता. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ 150 वर्ष साजरी केली जात आहेत.