1) मा. आयुक्त महोदय यांनी दिनांक 24/05/2022 रोजी कंत्राटी कामगारांना 8 दिवशीय किरकोळ रजा लागू करण्यासंबधी निर्णय जारी केला असून त्याची अद्याप आजपर्यंत कोणतीही अंमलबजावणी झालेली नाही. संबधित विभाग अधिकारी यांना विषय मार्गी लावण्याबाबत कोणतेही गांभीर्य नाही. येणाऱ्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये सदर 8 दिवशीय किरकोळ रजांबाबत तरतूद करण्याची सूचना विभागप्रमुख यांना द्यावी.
2) कोपरखैरणे पाणीपुरवठा विभागातील कंत्राटदाराने कामगारांना 1 जानेवारी 2020 पासून ते आजपर्यंतची वाढीव पगारातील थकबाकी अंदाजे 8 ते 9 हजार प्रत्येकी दिलेली नाही. कामगारांनी कंत्राटदार व अधिकारी यांना यासंबधी विचारणा केली असता कामगारांना उडवाउडवीची उत्तरे दिली जातात व इतर सुविधाही दिल्या जात नाही. कामगारांची पिळवणूक होत आहे. आपण सदर विषयाची चौकशी करून कारवाही करण्याचा सूचना द्याव्यात.
3) युनियनने केलेल्या मागणीस अनुसरून मा.अतिरिक्त आयुक्त यांनी दिनांक 18/01/2023 रोजी उद्यान विभागातील माळी होताना दिसत नाही. शहर अभियंता विभागाने त्यांच्या विभागातील कुशल पंप, ऑपरेटर, पर्यवेक्षक, वायरमन, नळ कारागीर, फिटर, मीटर वाचक, वाहन चालक, तारतंत्री इत्यादी व अर्धकुशल उद्यान माळी कामगार, सुरक्षा रक्षक या पदासंदर्भात सर्व कार्यकारी अभियंता यांना लेखी सूचना देऊन येणाऱ्या नवीन निविदा प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यास सांगितले. वरीलप्रमाणे उद्यान उपायुक्त यांनी माळी पदास अर्धकुशल करण्या संदर्भाच्या सूचना संबधित कार्यालयप्रमुख यांना देण्याबाबत आपण सूचित करावे.
4) नवी मुंबई महापालिकेमध्ये 7 ते 8 हजार कंत्राटी कामगार कार्यरत आहे. या कामगारांच्या वेतनातून किमान वेतन कायद्यानुसार व कपात केली जाते. परंतु काही कंत्राटदाराकडून हाच पैसा भविष्य निर्वाह निधीकडे जमा केला जात नाही,कामगारांची फसवणूक केली जाते व सुविधांच्या नावाखाली वेतन कपात केले जाते परंतु त्याबाबतीत ज्या सुविधा मिळणे गरजेचे आहे, त्यांना त्या दिल्या जात नाही. संबधित अधिकारी यांच्याकडून सदर कंत्राटदाराची संबधित बाबीची पडताळणी न करत देयके अदा केली जातात. सदर गोष्टीमध्ये आपण लक्ष देऊन योग्य ती कारवाही करावी व इथून पुढे या सर्व बाबीची पडताळणी केल्याशिवाय कंत्राटदारास देयके अदा करून नयेत अशा सूचना द्याव्यात.
5) नवी मुंबई महापालिकेतील कंत्राटी कामगारांना समान काम समान वेतन मिळावे यासाठी युनियनने सातत्याने पाठपुरावा केला आहे. त्याच पाठपुराव्यामुळे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिनांक 26/07/2022 रोजी समान काम समान वेतनाचा प्रस्ताव प्रधान सचिव, नगर विकास यांच्याकडे सादर केला. त्यानंतर 8 ते 9 महिन्याचा कालावधी झाला तरी सदर प्रस्ताव प्रलंबित आहे. आपणास विनंती आहे की, सदर प्रस्ताव संदर्भात मंत्रालयात नगर विकास विभागाकडे संयुक्त मिटिंग आयोजित करून सदर निर्णय लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा.