Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये पटत नाही, सतत भांडणं होतात? मग बेडरूममधून आजच काढून टाका या वस्तू

Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये पटत नाही, सतत भांडणं होतात? मग बेडरूममधून आजच काढून टाका या वस्तू
Vastu Shastra : पती-पत्नीमध्ये पटत नाही, सतत भांडणं होतात? मग बेडरूममधून आजच काढून टाका या वस्तू


संसारामध्ये पतीचं जेवढं महत्त्व आहे, तेवढंच पत्नीचं देखील महत्त्व आहे. असं मानलं जातं की पती आणि पत्नी हे संसाररूपी रथाची दोन चाकं आहेत, यातील एक चाक जरी मागे पुढे झालं किंवा चाकांनी गती बदलली तर संसाराचं वाटोळं होतं. दोन्ही चाक जर समान गतीने धावत असतील तर मग मात्र संसाराचा गाडा सुरळीत चालतो. मात्र अनेकदा असं देखील होतं की काहीही कारण नसताना पती-पत्नीमध्ये भांडणं होतात. जर पती-पत्नीमध्ये नेहमी भांडणं होत असतील तर त्याचा परिणाम हा संपूर्ण घरावर होतो. घरात लहानं मुलं असतील तर अशा वातावरणाचा त्यांच्यावर देखील नकारात्मक परिणाम होतो आणि ते देखील चिडचिड करतात. पती-पत्नीमध्ये भांडणासाठी त्या घरात असलेला वास्तुदोष देखील कारणीभूत असू शकतो, अनेकदा असं होतं की, आपण काही छोट्या-छोट्या चुका करतो आणि त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो. वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये काही उपाय सांगितले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

नकारात्मक पेंटिंग – जर तुमच्या बेडरूमध्ये काही नकारात्मक फोटो, प्रतिमा असतील तर त्या बेडरूमधून काढून टाकाव्यात असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे. अशा प्रतिमांचा, छायाचित्रांचा पती-पत्नीच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो, आणि त्यामुळे घरता कलह वाढतो, त्यामुळे असे फोटो बेडरूममधून काढून टाकले पाहिजेत असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. त्याऐवजी बेडरूममध्ये राधा-कृष्ण यांचा फोटो लावाला, मात्र इथे एक गोष्ट लक्षात ठेवावी बेडरूममध्ये फक्त एकट्या राधा किंवा एकट्या कृष्णाचा फोटो लावू नये, तर दोघांची फोटो लावावा, त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते.

काटेरी झाडं – सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या बेडरूममध्ये काटेरी झाडं असतील अपवाद गुलाब वगळता तर अशी काटेरी झाडं बेडरूममधून काढून टाकावीत असा सल्ला वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आला आहे, कारण त्याचा तुमच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होतो. घरात नेहमी भांडणं होतात, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे.

काळा पडदा – वास्तुशास्त्रानुसार बेडरूमच्या खिडक्यांना कधीही काळा पडदा असू नये, जर तुमच्याही बेडरूमच्या खिडक्यांना काळा पडदा असेल तर तो काढून त्याजागी इतर रंगाचा पडदा लावावा, काळ्या रंगाचा पती-पत्नीच्या नात्यावर नकारात्मक परिणाम होतो, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *