Headlines

vastu Shastra : सायंकाळच्या वेळी कधीही दान करू नये या वस्तू, घरात येते गरिबी

vastu Shastra : सायंकाळच्या वेळी कधीही दान करू नये या वस्तू, घरात येते गरिबी
vastu Shastra : सायंकाळच्या वेळी कधीही दान करू नये या वस्तू, घरात येते गरिबी


हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला खूप महत्त्व आहे. वास्तुशास्त्र हे केवळ तुमच्या घराची रचना कशी असावी? एवढ्या पुरतचं मर्यादित नाहीये, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात वेगवेगळ्या समस्या निर्माण होत असतात. या समस्या दूर करण्यासाठी देखील वास्तुशास्त्रात वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी असतात ज्या आपण नकळत जरी केल्या तरी त्याचा विपरीत परिणाम हा आपल्या घरावर होतो. जेव्हा आपण अशा गोष्टी करतो तेव्हा अचानक आपल्या पाठीमागे संकटाची मालिका सुरू होऊ शकते. त्यामुळे याबद्दल खबरदारी घेतली पाहिजे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. वास्तुशास्त्रात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, त्या जर तुम्ही सायंकाळच्या वेळी दान केल्या तर त्यामुळे तुमच्यावर लक्ष्मी मातेची अवकृपा होऊ शकते, तुमच्या घरात गरीबी येऊ शकते, आज आपण अशाच काही गोष्टींबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

कात – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी कोणालाही कधीही कात देऊ नये, कारण यामुळे घरावर लक्ष्मी मातेची अवकृपा होते, असं मानलं जातं. त्यामुळेच अनेक ठिकाणी तुम्ही दुकानात जरी गेलात तरी देखील अनेक दुकानदार हे तुम्हाला सायंकाळच्यावेळी कात देत नाहीत. यामागे देखील हेच कारण असतं.

मीठ – मीठाला लक्ष्मी मातेचं प्रतिक मानलं जातं. त्यामुळे सायंकाळच्यावेळी कधीही कोणालाही उसणं मीठ देऊ नये, त्यामुळे तुम्हाला आर्थिक समस्या येऊ शकतात, घरात वास्तुदोष निर्माण होतो असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

झाडू – वास्तुशास्त्रानुसार तुम्ही घरात जो झाडू वापरता तो सायंकाळच्यावेळीच काय तर इतर कोणत्याही वेळी कोणालाही देऊ नये, यामुळे घरात आर्थिक समस्या येतात. पैशांची चणचण भासते असं वास्तुशास्त्रात म्हटलं आहे.

धन प्राप्तीचे सोपे उपाय – जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी येत असतील, घराला आर्थिक स्थैर्य लाभत नसेल तर त्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. त्यातील सर्वात प्रभावी उपाय म्हणजे तुमच्या घराची पश्चिम दिशा ही नेहमी स्वच्छ ठेवा. या दिशेला कधीही कोणतंही सामान नसावं, तसेच तुमच्या घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला एक कुबेराचा फोटो लावा, त्याची दररोज पूजा करा. कारण उत्तर दिशा ही कुबेराची आवडती दिशा आहे. त्यामुळे तुम्हाला कधीही आर्थिक समस्या येणार नाहीत, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *