Video: बॉसने दिला जबरदस्त बोनस! नोटांचे बंडल ठेवत म्हणाला, घ्या, जितके घेऊ शकता तितके घ्या!

Video: बॉसने दिला जबरदस्त बोनस! नोटांचे बंडल ठेवत म्हणाला, घ्या, जितके घेऊ शकता तितके घ्या!
Video: बॉसने दिला जबरदस्त बोनस! नोटांचे बंडल ठेवत म्हणाला, घ्या, जितके घेऊ शकता तितके घ्या!


पैसे कमावण्यासाठी प्रत्येक व्यक्ती ही प्रचंड मेहनत घेत असते. सकाळ पासून संध्याकाळपर्यंत काम करत असते. मग ते कोणतेही काम असो. प्रत्येकाला जगण्यासाठी लागणाऱ्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे हे लागतात. पण कधी काम करणाऱ्या लोकांना अपेक्षा असतात की आपला बॉस आपल्याला बोनस देईल. सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून अनेक कर्मचाऱ्यांना वाटले असेल की हे आपल्यासोबत कधी होणार. हा व्हिडीओ अक्षरश: स्वप्नवत आहे.

नेमकी भानगड काय?

सध्या एक कंपनी आणि तिचा बॉस खूप चर्चेत आहे. कारण, हा बॉस बोनस देण्याच्या अनोख्या पद्धतीसाठी ओळखला जात आहे आणि त्याचा प्रत्येक कर्मचारी उत्सुक दिसत आहे. कारण, तो कर्मचाऱ्यांना ठराविक रक्कम बोनस म्हणून देत नाही, तर रोख पैसे देतो. पैसे देताना तो जितके घेऊ शकता तितके घ्या असे देखील म्हणत आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्ट नुसार, एक चिनी कंपनी आणि तिच्या बॉसने २७० मिलियन युआनच्या नफ्यातून १८० मिलियन युआन (२६ मिलियन अमेरिकी डॉलर)चा बोनस वर्षाच्या शेवटी वाटून चर्चेचा केंद्रबिंदू बनले.

१३ फेब्रुवारी रोजी, हेनान कुआंगशान क्रेन कंपनी लिमिटेडने आपला वार्षिक समारंभ आयोजित केला. या दरम्यान सुमारे ६० मिलियन युआन (८.७ मिलियन अमेरिकी डॉलर) पेक्षा जास्त रोख बोनस तिथेच वाटला गेला. या वेळी सुमारे 7000 लोकांसाठी 800 जेवणाचे टेबल्स लावण्यात आले होते. नंतर बंडलच्या बंडल टेबलवर ठेवले गेले. मग कर्मचाऱ्यांना बोनस घेण्यासाठी बोलावले गेले.

कसा मिळाला बोनस

कर्मचाऱ्यांना ठराविक वेळेत नोटांचे बंडल उचलून रक्कम मोजावी लागली. ठरलेल्या वेळेत जितकी रक्कम मोजली, ती घरी नेऊ शकतात. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी नोटांचे बंडल उचलून मोजून आपल्याजवळ ठेवले. वेळ संपल्यानंतर ज्याच्याकडे जितके नोटांचे बंडल होते, ते त्यांचा बोनस होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे ऑनलाइन प्रसारण केले गेले. सोशल मीडियावर कंपनीच्या बोनस वितरण कार्यक्रमाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. कर्मचारी टेबलवर पसरलेले रोख पैसे मोजताना किंवा खाली ठेवलेले नोटांचे बंडल उचलताना दिसत आहेत. कारण, बोनस वितरण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये झाले, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये रोख वेगवेगळ्या पद्धतीने वाटले गेले. पण शर्त एकच होती – ठराविक वेळेत रोख मोजून आपल्याजवळ ठेवणे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *