
Raj Thackeray And Uddhav Thackeray मुंबई: महाविकास आघाडी आणि मनसेचं शिष्टमंडळ निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक आयोगाची (Election Commission) भेट घेण्यासाठी मंत्रालयात पोहोचले आहेत. पहिला मंत्रालयाच्या समोर असलेल्या शिवसेना ठाकरे गटाच्या ‘शिवालय’ या कार्यालयात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राज ठाकरे (Raj Thackeray), शरद पवार (Sharad Pawar), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray), अंबादास दानवे, बाळासाहेब थोरात, अनिल देशमुख, बाळा नांदगावकर यांच्यासह अनेक नेते दाखल झाले होते. या ठिकाणी एक बैठक झाल्यानंतर सर्व नेते मंत्रालयात निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी रवाना झाले.
शिवसेना ठाकरे गटाच्या शिवालय कार्यालयात सुरुवातील उद्धव ठाकरे दाखल झाले होते. त्यानंतर शरद पवार आणि राज ठाकरेही दाखल झाले होते. शिवालयात पोहोचताना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वेगवेगळ्या (Uddhav Thackeray And Raj Thackeray) कारमधून दाखल झाले होते. मात्र शिवालयामधून मंत्रालयात जाताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही राज ठाकरेंच्या कारमध्ये बसले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेच्या मागच्या सीटवर आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पुढच्या सीटवर बसलेले दिसले.
शिष्टमंडळात कोण कोण?
- शरद पवार
- उद्धव ठाकरे
- राज ठाकरे
- वर्षा गायकवाड
- संजय राऊत
- जयंत पाटील
- सुभाष लांडे
- अजित नवले
- रईस शेख
- बाळासाहेब थोरात
निवडणूक आयोगाला शिष्टमंडळ काय भेटतंय?
- निवडणूक यंत्रणेवरील विश्वास दृढ करण्यासाठी चर्चा
- लोकशाही बळकट करण्यावर चर्चा
- स्था.स्व.संस्थांच्या निवडणुका पारदर्शी व्हाव्या अशी मागणी
- महाराष्ट्रातील मतदारयाद्यांचा घोळ दूर करावा अशी मागणी
संबंधित बातमी:
आणखी वाचा