
नवी दिल्ली : हरियाणातील फरीदाबाद येथून 360 किलो अमोनियम नायट्रेड जप्त करण्यात आल्यानंतर आज सायंकाळी 6.55 मिनिटांनी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red fort) भीषण स्फोट झाला. देशाला हादरवणाऱ्या या स्फोटात 11 जणांना आपला जीव गमवावा लागला असून 15 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेनंतर सुरक्षा यंत्रणांनी सर्वत्र हाय अलर्ट जारी केला असून पोलिसांसह फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचल्या आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit shah) यांच्याशी फोनवरुन संवाद साधल्यानंतर अमित शाह यांनी माध्यमांतून देशाला संबोधित केले. संबंधित स्फोटाच्या (Delhi blast) घटनेची माहिती देत ह्युंडाई आय-20 कारमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती दिली.
देशाची राजधानी दिल्ली भीषण स्फोटाने हादरल्याने मुंबईसह प्रमुख शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला असून 15 जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. या स्फोटात अनेक गाड्या आगीच्या भक्ष्यस्थानी आल्या असून स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांच्या शरिरीचे अवयवही रस्त्यावर छिन्न विछिन्न अवस्थेत पडल्याचं दिसून आलं. त्यावरुन, या स्फोटाची दाहकता लक्षात घेता येईल. दरम्यान, अद्याप या स्फोटाचं कारण समजलं नसले तरी मुंबईसह राज्यभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी दाखल झाले आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या असून आग आटोक्यात आणली जात आहे. गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला संबोधित करताना घटनेची माहिती दिली.
काय म्हणाले गृहमंत्री अमित शाह (Amit shah on delhi blast)
गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, लाल किल्ल्याजवळी मेट्रो स्टेशन परिसरात हा भीषण स्फोट सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास घडला. लाल किल्ल्याजवळील सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलवर एक ह्युंडाइ आय-20 कारमध्ये हा स्फोट झाला. या स्फोटामध्ये काही पादचारी प्रवासी जखमी झाले असून काही वाहने आगीच्या भक्ष्यस्थानी आली आहेत. प्राथमिक माहितीनुसार या स्फोटात काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याचे समजते. स्फोटाची माहिती मिळताच 10 मिनिटांत दिल्ली स्पेशल पोलीस पथक, दिल्ली क्राइम ब्रांच घटनास्थळी दाखल झाली होती. NSG आणि NIA च्या टीमनेही फॉरेन्सिक टीमसह FSL स्फोटाचा तपास सुरु केला आहे. तसेच, परिसरातील सर्व CCTV कॅमेऱ्याच्या माध्यमातून तपासाचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अमित शाह यांनी दिली. तसेच, मी दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी यांच्यशी फोनवरुन संवाद साधला. दिल्ली पोलीस आयुक्त आणि विशेष शाखा प्रभारी घटनास्थळावर दाखल झाले आहेत. या संपूर्ण परिस्थितीवर आम्ही विचार करत सर्वच बाजुंनी विचार करत तपास सुरू आहे. चोहोबाजूंनी तपास सुरू असून लवकरच जनतेपुढे या घटनेची संपूर्ण माहिती दिली जाईल, असेही अमित शाह यांनी म्हटले. दरम्यान, या संवादानंतर अमित शाह रुग्णालयात जखमींच्या भेटीसाठी रवाना झाल्याचं पाहायला मिळालं.
#WATCH | दिल्ली: लाल किला मेट्रो स्टेशन के पास विस्फोट | केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने कहा, “आज शाम लगभग 7 बजे, दिल्ली में लाल किले के पास सुभाष मार्ग ट्रैफ़िक सिग्नल पर एक हुंडई i20 गाड़ी में विस्फोट हुआ। इस विस्फोट में कुछ पैदल यात्री घायल हो गए और कुछ वाहन क्षतिग्रस्त हो गए।… pic.twitter.com/4BPaJQiwiu
— ANI_HindiNews (@AHindinews) November 10, 2025
हेही वाचा
आणखी वाचा