Mumbai News : मुंबईच्या अंधेरी पश्चिम लोखंडवाला परिसरामधून (Lokhandwala area) दोन दहशतवाद्यांना पकडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कामधेनू शॉपिंग सेंटरमधून दोन दहशतवाद्यांना पकडल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. मात्र, या व्हायरल व्हिडीओ संदर्भात ओशिवरा पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. जर मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तर कशा पद्धतीने त्यावर कारवाई केली पाहिजे, या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून मॉकड्रिल करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट घटना घडल्यानंतर मुंबई पोलीस मुंबई परिसरात अलर्ट मोडवर
दिल्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट घटना घडल्यानंतर मुंबई पोलीस मुंबई परिसरात अलर्ट मोडवर आहे. जर मुंबईत दहशतवादी हल्ला झाला तर कशा पद्धतीने त्यावर कारवाई केली पाहिजे या अनुषंगाने मुंबई पोलिसांकडून मॉकड्रिल करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी लोखंडवाला परिसरात मॉकड्रिल करताना अज्ञात व्यक्तीने व्हिडिओ काढून व्हायरल केला आहे. व्हायरल व्हिडीओचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं ओशिवरा पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, दिल्लीच्या स्फोटानंतर सुरक्षा यंतरणा सतर्क झाल्या आहेत. महत्वाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलीस मॉकड्रिल देखील घेत आहेत.
मुंबई, पुणे आणि नागपूरसह इतर प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक
देशाची राजधानी दिल्लीत 10 नोव्हेंबर रोजी मोठा स्फोट (Delhi Bomb Blast) झाल्याची घटना घडली आहे. ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळील मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 च्या परिसरातून जाणाऱ्या एका कारमध्ये (Delhi Car Blast) सोमवारी सायंकाळी सुमारे 6.52 वाजता भीषण स्फोट (Delhi Red Fort Blast) झाला. या स्फोटात एकूण 9 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 24 जण जखमी झाले आहेत. या स्फोटानंतर राजधानीतील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे सतर्क झाल्या आहेत. तर दिल्लीतील बॉम्बस्फोटानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबई, पुणे आणि नागपूरसह इतर प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सारख्या गर्दीच्या ठिकाणी आणि नागपूरमधील संवेदनशील असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयाभोवती पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नागपूरच्या संघ मुख्यालय परिसराला तिहेरी स्वरुपाच्या सुरक्षा घेरा घालण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुंबईतही रेल्वे स्थानकांवर डॉग स्कॉडच्या मदतीने तपासणी केली जात आहे आणि संशयित व्यक्तींची चौकशी होत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Delhi Blast Alert: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर राज्यभरात अलर्ट, मुंबई पुण्यासह नागपुरातील संघ मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ; पोलिसांचा चोख बंदोबस्त
आणखी वाचा