Headlines

Video: एवढी नमक हराम, निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात बघितली नाही, आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना काय काय म्हणाले?

Video: एवढी नमक हराम, निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात बघितली नाही, आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना काय काय म्हणाले?
Video: एवढी नमक हराम, निर्लज्ज व्यक्ती आयुष्यात बघितली नाही, आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंना काय काय म्हणाले?


मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या शेटवटच्या आठवड्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात खडाजंगी पाहायला मिळत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांना आज सभागृहात प्रस्ताव 293 अन्वये प्रस्ताव मांडला, मात्र यावेळी बोलताना त्यांना अडवणूक करण्यात आल्याने विरोधक चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला. भास्कर जाधव यांनी सभागृहाबाहेर येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाकरेंवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकेवर घणाघाती प्रहार केला. तर, भास्कर जाधव यांच्यानंतर आमदार आदित्य ठाकरे (Aaditya thackeray) यांनीही एकनाथ शिंदेंवर गद्दार, नमक हराम, अहसान फरामोश म्हणत जोरदार टीका केली. तत्पूर्वी, एकनाथ शिंदेंनी सभागृहात नाव न घेता उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारावरुन टीका केली होती. 

भास्कर जाधव यांनी सभागृहात 293 अन्वये प्रस्ताव मांडला, म्हणजेच राज्याच्या विविध समस्या अंतर्भूत करुन समस्या माडंलेल्या असतात आणि संबंधित मंत्र्यांनी उत्तरे द्यावीत असे याचे संकेत आहेत, प्रस्तावावर बोलताना त्यांची अडवणूक करण्यात आल्याने संताप व्यक्त केला. त्यानंतर, सभागृहाबाहेर अत्यंत आक्रमक पावित्र्यामध्ये राहुल नार्वेकरांचा दुतोंडी अध्यक्ष आणि स्वतःला सरकार समजत असल्याचे सांगत टीका केली. विधानसभा अध्यक्षांनी सरकार बरखास्त करून स्वत: उत्तरे द्यावीत, असा टोला सुद्धा लगावला. अध्यक्ष स्वतःला ज्ञानी समजतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. तर, आदित्य ठाकरे यांनीही यावेळी एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल केला. 

परवा सभागृहात चड्डी बनियन गँगच्या लोकांनी जे काही ओम भट स्वाह: केलं ते आपण सर्वांनी पाहिलंय. म्हणूनच मी हातवारे केले, टाचण्या-टोचण्याबाबत हो केले मी हातवारे, माझ्यावर करा कारवाई असे म्हणत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. उपमुख्यमंत्र्यांइतके नमक हराम, गद्दार, एहसान फरामोश व्यक्ती पाहिले नाहीत. यांच्यासारखा निर्लज्ज व्यक्ती मी आयुष्यात पाहिला नाही, असे म्हणत आदित्य ठाकरेंनी थेट नाव न घेता एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. आम्ही अनेक मुद्दे आणि प्रश्न सभागृहात उपस्थित केले, आम्ही जे विषय मांडले त्यावर नगरविकास मंत्री फक्त आणि म्हणून आणि म्हणून (अॅक्टींग केली) बोलले. म्हणूनच, तोंडवर गद्दार आणि नमक हराम बोललो. या मिंदेंचं नाव कुठेही घेतलं नव्हतं, पिच्चर वैगरे सर्व खोटं आहे

काही संस्कार झाले आहेत की नाही?

उद्धव ठाकरे सरकारने सर्व दिलं, यांना कोण ओळखत तरी होतं का? या आधीच्या सरकारने आपण माहिती घ्या, मुख्यमंत्र्यांनी नगरविकास खातं कोणाला कधी दिलयं का?. पण, याना दिलं यांनी काय केलं तर गद्दारी. यांना जराही लाज वाटत नाही, ज्या व्यक्तीने एवढं सगळं दिलं त्यांच्यावर आरोप करता. काही संस्कार झाले आहेत की नाही, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी नाव न घेत थेट एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला. डोळ्यात डोळे घालून आरोप करा म्हटलं. मात्र, तिही त्यांच्यात हिंमत नाही, खाली बघूनच बोलतात, असा टोलाही आदित्य यांनी लगावला. 

हेही वाचा

दिनो मोरियाने तोंड उघडलं तर अनेकांचा मोरया होईल; एकनाथ शिंदेंचा थेट विधानभवनातून इशारा

आणखी वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *