Headlines

Vijay Wadettiwar | विलीनीकरणासाठी गुजरातच्या उद्योगपतींकडून मध्यस्थी; वडेट्टीवार यांच्या दाव्याने खळबळ

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगल्याच रंगू लागल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना थेट भाष्य केलं आहे. विलीनीकरणासाठी गुजरातमधील काही मोठ्या उद्योगपतींकडून मध्यस्थी करण्यात आली आहे, असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. विलीनीकरणासाठी सर्वांत मोठा अडथळा म्हणजे NDA सोबत राहण्याची अट. “NDA ला पाठिंबा देण्याची अट यावर फक्त एकमत होणे बाकी आहे,” असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. तसेच, त्यांनी नमूद केले की, जर NDA सोबत राहण्याची अट मान्य असेल तरच विलीनीकरणाचा निर्णय अंतिम स्वरूपात घेता येईल. वडेट्टीवार यांच्या या विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *