Headlines

War End : अन् पाच दिवसांसाठी युद्ध थांबलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्याआधी पडद्यामागे काय-काय घडलं?

War End : अन् पाच दिवसांसाठी युद्ध थांबलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्याआधी पडद्यामागे काय-काय घडलं?
War End : अन् पाच दिवसांसाठी युद्ध थांबलं, डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा करण्याआधी पडद्यामागे काय-काय घडलं?


Iran Israel War : पश्चिम आशियात चालू असलेल्या युद्धाचा संपूर्ण जगाला फटका बसत आहे. भारतालाही या युद्धामुळे उर्जासंकटातून जावे लागत आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतील जलवाहतूकच बंद केल्याने हे उर्जासंकट अधिक गहिरे झाले आहे. जगभरातील तेल पुरवठा अबाधित राहावा म्हणून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकावले होते. आगामी 48 तासांच्या आता होर्मुझची सामुद्रधुनी जलवाहतुकीसाठी बंद न केल्यास आम्ही इराणच्या उर्जा निर्मिती स्थळांवर हल्ला करू, असे ट्रम्प जाहीरपणे म्हणाले होते. असे असतानाच आता ट्रम्प यांनी थेट यूटर्न घेऊन आगामी पाच दिवस इराणच्या उर्जास्थळांवर कोणताही हल्ला करणार नाही, अशी भूमिका जाहीर केली आहे. आता या भूमिकेमुळे अमेरिका इराणला घाबरली का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

ट्रम्प यांनी नेमका काय निर्णय घेतला?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाच दिवसांसाठी युद्ध थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून इराण आणि आमची चर्चा चालू झाली आहे. त्यामुळे मी आमच्या लष्कराला पुढच्या पाच दिवसांसाठी इराणच्या उर्जाकेंद्रांवर तसेच उर्जेच्या प्रकल्पांवर कोणताही हल्ला न करण्याचा आदेश दिला आहे. ट्रम्प यांच्या या घोषणेनंतर आता तात्पुरते का होईन युद्ध थांबल्याचे म्हटले जात आहे. या पाच दिवासांत इराण आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक चर्चा झाली तर भविष्यात हे युद्ध संपू शकते, तशी घोषणा होऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

इराणने काय दिला होता इशारा?

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला 48 तासांचे अल्टिमेटम दिल्यानंतर इराणने आम्ही अशा धमक्यांना भीक घालत नाही, अशी भूमिका घेतली होती. अमेरिकेने आमच्यावर हल्ला केला तर आम्ही पूर्ण पर्शियनचे आखात बंद करू. या आखाताच्या जलमार्गात आम्ही सुरंग पेरू, असा थेट इशाराच इराणने दिला होता. तसेच जे देश या युद्धात सामील नाहीत, त्यांनी आमच्याशी चर्चा केल्यावरच ते होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाऊ शकतील, असेही थेट सांगून टाकले होते. त्यामुळे आता भविष्यात काय होणार, इराण आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक चर्चा होणार का? याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *