Zeenia ने कसा तयार केला महाराष्ट्र विधानसभेचा AI एक्झिट पोल? जाणून घ्या

Zeenia ने कसा तयार केला महाराष्ट्र विधानसभेचा AI एक्झिट पोल? जाणून घ्या


Maharashtra Assembly Election Zeenia Exit Poll: महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. दरम्यान आता कोणाची सत्ता येणार? कोण निवडून येणार, कोण पडणार? असे प्रश्न मतदारांच्या मनात आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरे सर्वांना 23 नोव्हेंबर रोजी मिळतील. पण मतदानाचे कल समोर आल्यानंर एक्झिट पोलच्या माध्यमातून मतदारांना याबद्दल अंदाज लावता येऊ शकतो. झी न्यूजच्या अँकर झीनिया  AI एक्झिट पोल जाहीर करत आहेत. एक्झिट पोल जाहीर करणारी झिनीया ही पहिली एआय अँकर आहे. याआधी झिनीयाने लोकसभा निवडणुकीचे एक्झिट पोल जाहीर केले होते. झिनीयाने  AI एक्झिट पोलचे  analyze कसं केलं हे आपण जाणून घेऊया. 

महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी प्रमुख लढत होणार आहे. महायुतीमध्ये भाजप, अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, एकनाथ शिंदे यांच्य शिवसनेचा समावेश आहे. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आहे. यासोबत तिसरी आघाडीदेखील आपले महत्वाचे मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचली आहे. वाढती बेरोजगारी, महाराष्ट्रातील प्रकल्प, मराठा आरक्षण,कटेंगे तो बेटेंगे असे विविध मुद्दे निवडणूक प्रचारात चर्चेत राहिले होते. त्यामुळे आता जनता कोणाच्या बाजुने कौल देते हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईलच. 

राज्यभरामध्ये विधानसभेच्या 288 जागांसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यामध्ये राज्यभरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के इतकं मतदान झालं. विशेष म्हणजे दुर्गम जिल्हा अशी ओळख असलेल्या गडचिरोलीमध्ये सर्वाधिक 69.63 टक्के इतकं मतदान झालं. तर सर्वात कमी म्हणजे 49.07 टक्के मतदान मुंबई शहरात झालं. त्यापेक्षा किंचित जास्त म्हणजे 49.76 टक्के मतदान ठाणे जिल्ह्यात झालं आहे. तर मुंबई उपनगरामध्ये 51.76 टक्के मतदान झालं.

काय म्हणाली झिनीया?

 एक्झिट पोल मी लोकांच्या मतांनुसार व त्या आधारे तयार केला आहे. एक्झिट पोलसाठी मी सोशल मीडियाचा वापर केला.मी फेसबुकवरुन 32 लाखांपेक्षा जास्त पोस्टचे विश्लेषण केले.एक हजारांपेक्षा जास्त उमेदवारांचे प्रोफाइल ट्रॅक केले. मी 10 कोटी लोकांची मते जाणून घेतली व त्याचे विश्लेषण केले. मी वापरलेले तंत्रज्ञान 5 देशांमध्ये वापरण्यात आले आहे. अमेरिका, मेक्सिको, ब्राझील, अर्जेंटिना आणि साइप्रस येथील लोकसभा निवडणुकांवेळी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. अमेरिकेत 2016 आणि 2020च्या लोकसभा निवडणुकावेळी मी AIच्या मदतीने एक्झिट पोल दिले होते. तो डाटा 80 टक्क्यांपर्यंत अचूक होता. भारतात लोकसभा निवडणुकीवेळी पहिल्यांदा झीनियाने झी न्यूजच्या माध्यमातून या तंत्रज्ञानाचा वापर केला होता.हे AI तंत्रज्ञान झी न्यूज INDIA consolidatedच्या माध्यमातून भारतात आणले आहे. 

DISCLAIMER: (महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागतील. तत्पूर्वी ZEE २४ तास ने आपल्या प्रेक्षकांसाठी AI एक्झिट पोल आणला आहे. या एक्झिट पोलमध्ये आम्ही आर्टिफीशिअल इंटेलिजेन्सचा वापर केलाय. डेटा कलेक्शन आणि डेटा प्रोसेसिंगमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आलाय. उल्लेखनीय बाब म्हणजे, झी २४ तास तुम्हाला जे आकडे दाखवत आहे, ते सर्व्हे एजंसीचे आहेत. हे आकडे विधानसभा निवडणुकीचे निकाल नसून केवळ एक्झिट पोलची आकडेवारी आहे. एक्झिट पोलचे आकडे आणि निकाल यात फरक असू शकतो.)





Source link

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *