ZP Election:  सोलापूरात ईव्हीएम मशीनवरच जादूटोणा? तर कोल्हापूरात शिवसैनिकानं जागेवरच EVM मशीन फोडलं, एकच खळबळ

ZP Election:  सोलापूरात ईव्हीएम मशीनवरच जादूटोणा? तर कोल्हापूरात शिवसैनिकानं जागेवरच EVM मशीन फोडलं, एकच खळबळ
ZP Election:  सोलापूरात ईव्हीएम मशीनवरच जादूटोणा? तर कोल्हापूरात शिवसैनिकानं जागेवरच EVM मशीन फोडलं, एकच खळबळ


जिल्हा परिषद निवडणूकImage Credit source: टीव्ही ९ मराठी

ZP Election EVM Machine: राज्यात काल 12 जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान पार पडले. यावेळी अनेक धक्कादायक प्रकार घडले. जिल्हा परिषद निवडणुकीचे अनेक रंग समोर आले. काही ठिकाणी ईव्हीएम मशीनवरवच जादूटोणा करण्याचा प्रयत्न झाला. कोल्हापूरात मतदान केल्यावर शिवसैनिकाने जागेवरच ईव्हीएम मशीन फोडले. सोलापूरात तर ईव्हीएम मशीन थेट धाब्यावर पोहचले. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. निवडणुकीतील विविध रंग यानिमित्ताने समोर आले आहेत.

बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या,ईव्हीएमचं फोडलं

तर कोल्हापूरात एका शिवसैनिकाने अगोदर मतदान केलं. मग बॅलेट पेपरवर निवडणूक का नाही असा प्रश्न करत ईव्हीएम मशीन फोडलं. भुदरगड तालुक्यातील नाधवडे मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे ग्राहक सेनचे जिल्हाप्रमुख जयवंत वायदंडे यांनी ईव्हीएम मशीन जागेवरच आपटले. हे मशीन त्याचवेळी फुटले. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या अशी मागणी त्यांनी केली. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही वेळ तणावाचे वातावरण होते.

सोलापूरात ईव्हीएम मशीन थेट धाब्यावर

सोलापुरातील मोहोळ मध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावर सापडले. एका धाब्यावर ईव्हीएम मशीन सापडल्याने राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक पवित्रा घेतला होता. या घटनेनंतर घटनास्थळी निवडणूक अधिकारी सीमा होळकर तसेच पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही ईव्हीएम मशिन्स ताब्यात घेतल्या. त्या दोन ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावर कोणतेही मतदान झाले नसल्याची प्रशासनाने माहिती दिली. दरम्यान उमेश पाटलांच्या आक्षेपानंतर दोन्ही मशीन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रीतसर पंचनामा करुन स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या समोर या मशीनचा पंचनामा करण्यात आला.

धाराशिव येथील स्ट्रॉंग रूम भोवती 36 पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांचा पहारा

धाराशिव जिल्हा परिषद, आणि आठ पंचायत समितीसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली जिल्हा परिषदेच्या 55 जागेसाठी 234 उमेदवार तर पंचायत समितीच्या 110 जागेसाठी 293 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे त्या मतपेट्या धाराशिव शहरातील शासकीय आयटीआयमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्या स्ट्रॉंग रूम समोर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तेराशे आठ मतदान केंद्रांवर ही मतदान प्रक्रिया पार पडली अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

ईव्हीएम मशीनवरच जादूटोणा?

तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे मतदान केंद्रावर नियमीत मतदान सुरू होते. त्यावेळी एक महिला मतदान केंद्रावर गेली. मतदान करून बाहेर येताच ती महिला चक्कर येऊन कोसळली. शुद्धीवर आल्यावर तिने ईव्हीएम मशीनच्या खाली लिंबू-मिरची आणि जादूटोणा केल्याचा दावा केला. त्याठिकाणी लिंब-मिरची आढळल्याने एकच गोंधळ उडाला. हा प्रकार कोणी केला यावरून कार्यकर्ते आक्रमक दिसले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *