Headlines

आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट…

आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट…
आगामी मुख्यमंत्री कोण होणार? चर्चांदरम्यानच राष्ट्रवादीतील नेत्याचं फडणवीसांबाबत मोठं विधान, थेट…


सध्या राज्यभरात अगामी मुख्यमंत्री कोण अशा चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच उबाठा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं होतं की, देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. त्यांच्या या भाकितावर आता विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी गोंदियात माध्यमांशी संवाद साधताना अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री असून त्यांनीच राज्याचे नेतृत्व पुढेही करावे, अशी सर्वांची इच्छा असल्याचे सांगितले.

एकनाथ खडसे यांनी केलेल्या दाव्यावर प्रफुल पटेल यांनी खोचक प्रतिक्रिया देत खडसे यांनी आधी आपण नेमके कुठे आहोत हे ठरवावे, असा टोला लगावला. मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना महाराष्ट्रात राहणाऱ्यांनी मराठी बोलावी, मात्र केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर सक्ती करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *