Headlines

आम आदमी पार्टीत झाला तसाच भूकंप महाराष्ट्रात होणार? एकनाथ शिंदेंच नाव घेत ऑपरेशन टायगरबाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा

आम आदमी पार्टीत झाला तसाच भूकंप महाराष्ट्रात होणार? एकनाथ शिंदेंच नाव घेत ऑपरेशन टायगरबाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा
आम आदमी पार्टीत झाला तसाच भूकंप महाराष्ट्रात होणार? एकनाथ शिंदेंच नाव घेत ऑपरेशन टायगरबाबत बड्या नेत्याचा खळबळजनक दावा


गेल्या काही वर्षांपासून राज्याच्या राजकारणात मोठे बदल झालेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत शिवसेनेचे आमदार सोबत घेत भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीतही फूट पडली होती, अजित पवार यांनीही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. अशातच आता गेल्या काही काळापासून शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे. याबाबत आता मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केलं आहे. शिरसाट नेमकं काय म्हणाले ते जाणून घेऊयात.

ऑपरेशन टायगरबाबत शिरसाट म्हणाले…

आम आदमी पक्षात मोठी फूट पडली असून 7 खासदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता राज्यातील ऑपरेशन टायगरबाबत चर्चा रंगू लागली आहे. याबाबत बोलताना मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं की, ‘आमच्या संपर्कात सगळेजण आहेत हे आम्ही नाकारत नाही ऑपरेशन टायगर सांगून केलं जात नाही. मात्र योग्य निर्णय कधी घ्यायचा हा अधिकार शिंदे यांच्याकडे आहे. असे सांगून ऑपरेशन होत नाही मात्र योग्य वेळी राजकीय भूकंप पाहायला मिळेल.’ शिरसाट यांच्या या विधानामुळे आता पुन्हा एकदा जनतेचे लक्ष राज्याच्या राजकारणाकडे लागले आहे.

पुन्हा राजकीय भूकंप?

गेल्या काही काळापासून राज्यात मोठ्या प्रमाणावर पक्षांतर पहायला मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अनेक बड्या नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे समोर आले आहे. याचा फायदा देखील एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला झाला आहे. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे काही खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचे वृत्त आले होते. त्यानंतर आता शिरसाट यांनी पुन्हा या मुद्द्यावर भाष्य केले आहे, त्यामुळे आता आगामी काळात राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेनेकडून विधान परिषदेवर कोण जाणार?

विधान परिषदेसाठी शिंदे शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत आहे. यावर बोलताना शिरसाट म्हणाले की, विधान परिषदेमध्ये दोन जागा शिवसेनेच्या आहेत, यासाठी दहा-बारा इच्छुक उमेदवारांची यादी एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे. आता त्यात एक नंबर कोण दोन नंबर कोण असे कयास मीडियाच्या माध्यमातून लावले जात आहेत. अशी आतापर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत असतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *