Headlines

आयपीएल 2026 दरम्यान हा खेळाडू आरसीबी सोडून सीएसकेत जाणार? आर अश्विनच्या पोस्टने खळबळ

आयपीएल 2026 दरम्यान हा खेळाडू आरसीबी सोडून सीएसकेत जाणार? आर अश्विनच्या पोस्टने खळबळ
आयपीएल 2026 दरम्यान हा खेळाडू आरसीबी सोडून सीएसकेत जाणार? आर अश्विनच्या पोस्टने खळबळ


आयपीएल 2026 दरम्यान हा खेळाडू आरसीबी सोडून सीएसकेत जाणार? आर अश्विनच्या पोस्टने खळबळImage Credit source: IPL/BCCI

आयपीएल स्पर्धा आता मध्यावर आली आहे आणि पुढच्या टप्प्यात आणखी चुरस वाढणार आहे. आता टॉप 4 मध्ये राहण्यासाठी खेळाडूंची चढाओढ असणार आहे. असं असताना चेन्नई सुपर किंग्सच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. एकीकडे महेंद्रसिंह धोनी फिट होत नाही. दुसरीकडे, आयपीएल स्पर्धेतून चेन्नई सुपर किंग्सचा तिसरा खेळाडू बाद झाला आहे. फॉर्मात असलेला आयुष म्हात्रे दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात आयुष म्हात्रेला दुखापत झाली आणि त्याची तीव्रता पाहता त्याला स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. आता त्याची जागा भरून काढण्याचं आव्हान चेन्नई सुपर किंग्स संघावर आहे. या दरम्यान आर अश्विनने दिलेल्या पर्यायामुळे खळबळ उडाली आहे. आर अश्विनने आयुष म्हात्रेच्या रिप्लेसमेंटसाठी भन्नाट पर्याय दिला आहे. जर असं झालं तर आरसीबीचा खेळाडू चेन्नई सुपर किंग्सचा भाग होऊ शकतो.

आयुष म्हात्रे आयपीएल स्पर्धेला मुकल्यानंतर आर अश्विनने काही मिनिटातच सोशल मीडियावर एक पोस्ट केली. या पोस्टच्या माध्यमातून त्याने लोन नियमाची आठवण करून दिली. यासाठी त्याने युवा खेळाडूंची नावं घेतली. यात एक खेळाडू आरसीबीचा विहान मल्होत्रा आहे. आर अश्विनने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, ‘बरेच खेळाडू जखमी होत आहेत. सातव्या सामन्यानंतर लोन विंडो बंद होईल आणि अशा परिस्थितीत, आरसीबीने या जबरदस्त प्रतिभेला लोनवर घेणे ही एक चांगली कल्पना आहे. तो अजून एकही सामना खेळलेला नाही आणि त्यामुळे तो एक संभाव्य पर्याय आहे. विहान नसेल तर, अभिज्ञान कुंडू हा देखील एक चांगला डावखुरा पर्याय आहे, ज्याला भविष्यासाठी तयार केले जाऊ शकते.’

आर अश्विनने उल्लेख केलेला लोन नियम मागच्या पर्वापासून आयपीएल स्पर्धेत लागू आहे. यात स्पर्धेच्या सुरुवातीला काही सामन्यादरम्यान गरज भासल्यास कोणताही संघ हंगामाच्या उर्वरित कालावधीसाठी दुसऱ्या फ्रेंचायझीकडून एक खेळाडू उधार घेऊ शकतो. यासाठी काही अटी आहेत. एकही सामना न खेळलेल्या खेळाडूलाच उधारीवर दिलं जाऊ शकतं. इतकंच काय तर हा खेळाडू स्पर्धेच्या उत्तरार्धात आपल्या मुख्य संघाविरुद्ध खेळू शकत नाही. विहान आणि अभिज्ञान हे नुकताच 19 वर्षांखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होते. आरसीबीने विहानला 30 लाख रुपयांच्या मूळ किमतीत विकत घेतले असले तरी, तो अद्याप एकही सामना खेळलेला नाही. दुसरीकडे, अभिज्ञान लिलावात विकला गेला नाही.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *