Headlines

गाणं पाहिजे तर असं, इतकं सुपरहिट की शूटिंगच्या वेळी आमिर खान प्यायलेला 1 लीटर दारू, सेटवर उडलेला गोंधळ

गाणं पाहिजे तर असं, इतकं सुपरहिट की शूटिंगच्या वेळी आमिर खान प्यायलेला 1 लीटर दारू, सेटवर उडलेला गोंधळ
गाणं पाहिजे तर असं, इतकं सुपरहिट की शूटिंगच्या वेळी आमिर खान प्यायलेला 1 लीटर दारू, सेटवर उडलेला गोंधळ


Aamir Khan: 1990 च्या दशकातील सुपरहिट रोमँटिक चित्रपटांचा उल्लेख झाला की ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांच्या या चित्रपटाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले आणि आजही तो प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान राखून आहे. जवळपास तीन दशकांनंतरही या चित्रपटातील कथा, अभिनय आणि गाणी तितकीच लोकप्रिय आहेत.

चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूरच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. चित्रपटातील लोकप्रिय ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी आमिर खानने आपल्या भूमिकेला वास्तववादी स्वरूप देण्यासाठी एक वेगळाच प्रयोग केल्याचे सांगितले जाते.

शूटिंगपूर्वी मद्यपान केल्याचा खुलासा

या गाण्यात नायक ब्रेकअपच्या वेदनेत बुडालेला असून, नशेच्या अवस्थेत आपल्या भावना व्यक्त करताना दिसतो. पडद्यावर हा प्रसंग अधिक नैसर्गिक आणि प्रभावी दिसावा यासाठी आमिर खानने शूटिंगपूर्वी मद्यपान केल्याचा खुलासा अभिनेत्री अर्चना पूरण सिंगने एका मुलाखतीत केला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार, ती सीनसाठी आमिरने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले होते, ज्यामुळे त्याचा अभिनय अधिक जिवंत आणि वास्तववादी वाटला.

‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट 1996 मध्ये प्रदर्शित झाला होता. तुलनेने मर्यादित बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर विक्रमी कमाई केली आणि त्या वर्षातील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. तसेच चित्रपटाला अनेक प्रतिष्ठित पुरस्कारही मिळाले.

चित्रपटातील सर्व गाणी हिट

चित्रपटाचे संगीत दिग्गज संगीतकार जोडी नदीम-श्रवण यांनी दिले होते, तर गीतकार ‘समीर’ यांनी गाणी लिहिली होती. ‘तेरे इश्क में नाचेंगे’सह ‘परदेसी परदेसी’, ‘आए हो मेरी जिंदगी में’ आणि ‘पूछो जरा पूछो’ ही गाणी आजही रसिकांच्या आवडीची आहेत. या गाण्यांना उदित नारायण, कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांनी स्वर दिले होते.

आजही ‘राजा हिंदुस्तानी’ हा चित्रपट आणि त्यातील गाणी प्रेक्षकांच्या आठवणीत ताजी आहेत. विशेषतः ‘तेरे इश्क में नाचेंगे’ या गाण्याशी जोडलेला आमिर खानचा हा किस्सा चाहत्यांमध्ये कायम चर्चेचा विषय ठरत असतो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *