Headlines

जगात हाहाकार! अमेरिका इस्त्रायल यांच्यासोबतच या देशाकडूनही इराणवर हल्ले, धक्कादायक रिपोर्ट, थेट..

जगात हाहाकार! अमेरिका इस्त्रायल यांच्यासोबतच या देशाकडूनही इराणवर हल्ले, धक्कादायक रिपोर्ट, थेट..
जगात हाहाकार! अमेरिका इस्त्रायल यांच्यासोबतच या देशाकडूनही इराणवर हल्ले, धक्कादायक रिपोर्ट, थेट..


इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध थांबायला हवे. या युद्धाने जागतिक बाजारपेठ अडचणीत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ होत आहे. एक संकट जगापुढे आहे. या युद्धाला तीन महिने पूर्ण होऊन गेली. त्यामध्येच आता धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संयुक्त अरब अमिरातीने (युएई) अमेरिका आणि इस्रायल यांच्यात इराणविरुद्ध झालेल्या युद्धात सहभागी होते. इराणवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये थेटपणे भाग युएईने घेतला. या माहिती खळबळ उडाली. इराणला यावर पहिल्यापासूनच संशय होता. इराणकडून मोठे आरोपही केली जात होती. या तीन महिन्याच्या युद्धात थेटपणे युएई सहभागी होता. या युद्धादरम्यान यूएईने इराणवर डझनभर हवाई हल्ले केले. वॉल स्ट्रीट जर्नलच्या एका अहवालानुसार, यूएईने या हल्ल्यांसाठी अमेरिका आणि इस्रायलकडून मिळालेल्या गुप्त माहितीचा वापर केला आणि इराणवर हल्ले केले.

या माहितीमुळे इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्ध अधिक भडकण्याचे संकेत आहेत. अमेरिकेने केलेल्या हल्ल्यानंतर ज्या ज्या आखाती देशात अमेरिकेने तळ आहेत, अशा ठिकाणी इराणकडून हल्ले करण्यात आली. अमेरिका, इस्त्रायल आणि युएई या तिन्ही देशांसोबत एकटा इराण लढत असल्याचे स्पष्ट झाल्याने आता जगाला धक्का बसला. मात्र, तरीही इराण हार मानत नाहीये.

संयुक्त अरब अमिरातीच्या तेल आणि वायू सुविधांवरील इराणच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून ते युद्धाच्या मैदानात उतरल्याचे सांगितले जाते. काही हल्ले अमेरिकेने एप्रिलच्या सुरुवातीला युद्धविराम जाहीर केल्यानंतर झाले होते. मात्र, जगापुढे युएई आपण या युद्धापासून दूर असल्याचे दाखवत होती. मात्र, आता स्पष्ट झाले की, या युद्धात युएईचा सक्रिय सहभाग होता. फक्त सहभागच नाही तर त्यांच्याकडून हल्ले करण्यात आली.

इराण आणि अमेरिका युद्धात जर सर्वात जास्त नुकसान कोणाचे झाले असेल तर ते सर्व आखाती देश आहेत. आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकन तळावर हल्ला इराणने केला. शिवाय काही तेल प्रकल्पांवरही हल्ले करण्यात आले. कतारने देखील या युद्धात अमेरिकेला मदत केल्याचा आरोप इराणकडून केला जातो.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *