Headlines

जेव्हा-जेव्हा ट्रम्प अडचणीत, तेव्हा होतो गोळीबार, ताज्या हल्ल्याने पुन्हा नवी चर्चा

जेव्हा-जेव्हा ट्रम्प अडचणीत, तेव्हा होतो गोळीबार, ताज्या हल्ल्याने पुन्हा नवी चर्चा
जेव्हा-जेव्हा ट्रम्प अडचणीत, तेव्हा होतो गोळीबार, ताज्या हल्ल्याने पुन्हा नवी चर्चा


वॉशिंग्टनच्या हिल्टन हॉटेलात ट्रम्प यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. यात ट्रम्प वाचले आणि हल्लेखोर पकडला गेला आहे. मात्र, अमेरिकेत साल २०२४ मध्येही निवडणूकीच्या वातावरणात डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला हा जगभरात चर्चेचा विषय बनला होता. ट्रम्प यांचा रक्ताने माखलेला चेहरा, चारी बाजूने उभे असलेले अमेरिकन सीक्रेट सर्व्हीसचे एजंट आणि ट्रम्प यांनी समर्थकांच्या दिशेने मुठ उठवत केलेला इशारा…हा फोटो काही क्षणात आयकॉनिक बनला होता. मात्र, आता या घटनेनंतर आता ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळात झालेल्या हल्ल्याचा कटाची थिअरी पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आहे.

बटलर रॅलीची घटना …

ही घटना बटलर, पेन्सिल्वेनियात एका निवडणूक रॅली दरम्यान झाली होती. गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रम्प यांचे एजंट त्यांना तातडीने व्यासपीठापासून सुरक्षित स्थानावर घेऊन जात होते. या दरम्याने घेतलेल्या फोटोत ट्रम्प यांचा रक्ताने भिजलेला चेहरा आणि त्यांनी आपल्या समर्थकांच्या दिशेने उचलेली मूठ दिसत होती.

सोशल मीडिया आणि कटाचे दावे

या घटनेनंतर लागलीत काही तासात इंटरनेटवर अनेक दावे केले जात होते. काही लोकांनी ही घटना स्टेज्ड वाटत होती आणि ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेला फायदा पोहचवण्यासाठी रचलेली कहानी वाटत होती. हा दावा अजूनही संपलेला नाही. ट्रम्प यांच्या समर्थकातील काही लोकांनी देखील हा दावा पुन्हा करायला सुरुवात केली होती. कॉमेडियन टिम डिलन यांनी त्यांच्या पॉडकास्ट मध्ये म्हटले होते की बटलर येथील घटना स्टेज केली होती. निवडणूकीत लोक असे करतात असे म्हटले होते. डाव्या विचारसरणीच्या टककर कार्लसन आणि मार्जोरी टेलर ग्रीन यांचे वक्तव्य देखील या थिअरीच्या दिशेने हवा देताना दिसत होते.

जगात आधीही असे आरोप झाले होते

असे पहिल्यांदा झालेले नाही एखाद्या मोठ्या हल्ल्याला ‘स्टेज्ड’ ( बनावट ) म्हटले गेले असेल. १९९५ मध्ये इस्रायलचे पंतप्रधान यित्झाक राबिन यांच्या हत्ये संदर्भात देखील काही डाव्या कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचे आरोप केले होते. तसेच २०२२ मध्ये अर्जेंटीनाचे उप राष्ट्रपती क्रिस्टीन फर्नांडिस डी किर्चनर वर बंदूक ताणण्याच्या घटनेनंतर देखील आरोप लागले की यास भ्रष्टाचाराच्या केसवरुन लक्ष हटवण्यासाठी रचलेला डाव म्हणण्यात आले.
तपासात काय पुढे आलेय़

बटलरची घटना हजारो लोक, पत्रकार आणि कॅमेऱ्यांच्या समोर झाले होते. व्हीज्युअल फॉरेन्सिक तपासात पुढे आले की एक व्यक्तीजवळ इमारतीच्या छतावर चढला आणि ट्रम्प यांच्या दिशेने आठ गोळ्या झाडल्या. यात एक गोळी ट्रम्प यांच्या उजव्या कानाला स्पर्शून गेली होती. या हल्यात एक व्यक्ती कोरी कॉम्पेरेटोर यांचा मृत्यू झाला होता. तर दोन अन्य गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. हल्लेखोराला जागेवरच सीक्रेट सर्व्हीसने ठार केले होते. नंतर एफबीआयने त्याची ओळख २० वर्षीय थॉमस क्रुक्स अशी केली होती.

कोणी- कोणी केले आरोप ?

या घटनेनंतर वेगवेगळ्या राजकीय विचारधारेतील लोकांनी पुराव्यांशिवाय अनेक आरोप केले होते. काहींनी जो बायडन, काहींनी एफबीआय, काहीनी इस्रायल तर काहींनी स्वत: ट्रम्प यांच्यावर हा हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप लावला होता. मात्र, या दाव्यांच्या समर्थनार्थ कोणतेही ठोस पुरावे समोर आले नाही.

कोणताही हल्ल्याचा बनाव करणे शक्य आहे का ?

या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या मीडिया प्रोडक्शन तज्ज्ञ स्पेन्सर पार्सन्स यांनी एक काल्पनिक विश्लेषण केले. त्यांनी सांगितले की चित्रपटात शुटींगचा सीन तयार करण्यासाठी डायरेक्टर, कॅमेरा टीम, लायटींग, साऊंड, स्पेशल इफेक्ट्स आणि सेफ्टी टीम सारख्या मोठ्या संख्येत लोकांची गरज लागते. मात्र, एवढ्या मोठ्या घटनेला ‘स्टेज’ करायचे असेल तर कमीत कमी लोकांना सामील करावे लागेल, कारण त्याची गुप्तता राखणे अवघड ठरेल. त्यामुळे असा बनाव रचने अवघड असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

बटलर येथील लाईव्ह रॅलीत असे करणे शक्य नव्हते, कारण केवळ एक संधी असते. चारही बाजूंनी पत्रकार आणि सर्वसामान्य लोक, मोबाईल कॅमेरे कोणत्याही डिजिटल छेडछाडीची शक्यता समाप्त करतात.

‘फेक हल्लेखोर’ आणि परफेक्ट टायमिंगचे आव्हान

जर असा बनाव करायचा असेल तर हल्ले खोराला अशा जागी ठेवावे लागेल जेथे लोक त्याला पाहू शकतील, तो फायर देखील करु शकेल आणि सुरक्षा एजन्सीनी त्याला आधीच ठार देखील करु नये. या साठी एक परफेक्ट टायमिंग हवे, जे जवळपास अशक्य आहे. आणि हल्लेखोराला इतका अचूक निशाला लावाला लागेल की त्याने ट्रम्प यांच्या खूप जवळ गोळी मारावी आणि त्यांना काही होऊ नये, हे खूपच कठीण काम आहे असे तज्ज्ञ स्पेन्सर पार्सन्स यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *