
शिवसेना (उबाठा) गटातील ६ खासदार पक्षाची साथ सोडणार अशा चर्चांना उधाण आले आहे. सकाळपासूनच मोठ्या घडामोडी घडताना पहायला मिळत आहेत. दरम्यान, संजय राऊतांनी दिल्लीतून पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली, त्यानंतर ते ओम बिर्ला यांच्या भेटीला गेल्याचे समोर आले होते. लोकसभा अध्यक्षांच्या भेटीनंतर राऊतांनी काय सांगितले?
या भेटीबाबत तसेच एकूण प्रकरणाबाबत संजय राऊतांनी भाष्य केले. TV9 मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना संजय राऊत यांनी ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका मांडली आहे. ‘आता नीतिमत्ता, पक्षाची शिस्त अशा गोष्टी संपल्या आहेत. आम्ही व्हिप जारी केला आहे,’ असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. ‘आम्ही कायदेशीर लढाई लढत आहोत. पुन्हा एकदा खासदारांचे बोलावणे (बौठक) घेणार असून जर-तरचे राजकारण संपवून सर्व काही स्पष्ट करू.’ महत्त्वाचे म्हणजे संजय राऊतांनी लोकसभा अध्यक्षांना प्रकरणाची सविस्तर माहिती देत त्यानुसार निर्णय घेण्याची मागणी केली आहे. यानंतर त्यांनी ओम बिर्ला यांच्या प्रतिक्रियेबाबत सांगण्यास नकार दिला. इतकेच नाही तर संपूर्ण प्रकरणाबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया काय? याचे उत्तर देण्यासही त्यांनी नकार दिला.