Headlines

तुझा थेट जीव घेऊ, मोदींना झालमुडी विकणाऱ्या विक्रमला धमक्या; दुकानाबाहेर CRPF चे जवान तैनात!

तुझा थेट जीव घेऊ, मोदींना झालमुडी विकणाऱ्या विक्रमला धमक्या; दुकानाबाहेर CRPF चे जवान तैनात!
तुझा थेट जीव घेऊ, मोदींना झालमुडी विकणाऱ्या विक्रमला धमक्या; दुकानाबाहेर CRPF चे जवान तैनात!


Narendra Modi And Jhalmuri : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय झाला. सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेस या पक्षाला पायउतार व्हावे लागले. आता तिथे भाजपाचे शासन स्थापित झाले आहे. ही निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकदीने प्रचार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये जाऊन प्रचारसभा घेतल्या होत्या. अशाच एका प्रचारसभेदरम्यान त्यांनी अचानकपणे झालमुडी विकणाऱ्या एका स्टॉलला भेट दिली होती. त्यानंतर बंगालच्या राजकारणात तसेच देशातही या झालमुडीची आणि झालमुडी विकणाऱ्या विक्रेत्याची चर्चा झाली होती. झालमुडी विकणारी ती व्यक्ती देशभरात प्रसिद्ध झाली होती. दरम्यान, आता झालमुडी विकणारी हीच व्यक्ती अडचणीत सापडली आहे. माझ्या जीवितास धोका असल्याचा दावा या व्यक्तीने केला असून त्याला पोलीस संरक्षण देण्यात आले आहे.

विक्रम यांना थेट सीआरपीएफचे संरक्षण

मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या झालमुडी स्टॉटलला भेट दिला होती, त्या स्टॉलच्या मालकाला आता धमकीचे कॉल येत आहेत. मोदींना झालमुडी विकणाऱ्या त्या व्यक्तीचे नाव विक्रम असे आहे. मसा बंगलादेश आणि पाकिस्तान येथून हे कॉल येत आहेत, असा दावा विक्रम यांनी केला आहे. विक्रम यांच्या कुटंबीयांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे. हीच बाब गांभीर्याने घेऊन विक्रम यांना संरक्षण देण्यात आले आहे. विक्रम यांच्या स्टॉलच्या बाहेर सीआरपीएफचे शस्त्रधारी जवान दिसत आहेत.

माझा राजकारणाशी काहीही संबंध नाही

दुसरीकडे विक्रम यांना ज्या नंबरवरून कॉल आलेले आहेत त्यांना ट्रेस करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. विक्रम हे झाडग्राम येथील रहिवासी आहेत. त्या भागातही सध्या चिंतेचे वातावरण आहे. धमक्यांचे कॉल आल्यानंतर विक्रम यांनी माझा राजकारणाशी कोणाताही संंबंध नाही, असे सांगितले आहे. पंतप्रधान माझ्या दुकानावर अचानकपणे आले होते असे सांगत मला धमकी देणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी विक्रम यांनी केली आहे. दरम्यान, आता पोलीस धमकी देणाऱ्यांचा शोध कसा घेणार? विक्रम यांना धमकी नेमकी कोणी दिली? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *