Headlines

त्यांच्यासोबत 2 चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी..; अशोक सराफ यांच्यासाठी छगन भुजबळांची पोस्ट

त्यांच्यासोबत 2 चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी..; अशोक सराफ यांच्यासाठी छगन भुजबळांची पोस्ट
त्यांच्यासोबत 2 चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी..; अशोक सराफ यांच्यासाठी छगन भुजबळांची पोस्ट


मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा आज (4 जून) 79 वा वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहित त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनीसुद्धा इन्स्टाग्रामवर सुंदर फोटो शेअर करत आपलं प्रेम व्यक्त केलं. तर राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनीसुद्धा अशोक सराफ यांच्यासोबतचा एक जुना फोटो शेअर करत एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. अभिनयाच्या आवडीमुळे मला अशोक सराफ यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकारासोबत दोन वेगवेगळ्या मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. एकत्र काम करण्याच्या या अनुभवामुळे आमचं मैत्रीचं नातं अधिक दृढ आणि समृद्ध होत गेलं, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय.

छगन भुजबळ यांची पोस्ट

भुजबळांनी लिहिलं, ‘मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि माझे मित्र पद्मश्री अशोक सराफ यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! मागील वर्षी त्यांना मिळालेला ‘पद्मश्री’ पुरस्कार हा त्यांच्या अभिनय प्रवासाचा आणि कलासेवेचा सर्वोच्च गौरव होता. आपल्या मित्राच्या कलेचा आणि यशाचा झालेल्या सन्मानाचा मला सार्थ अभिमान वाटत आला आहे. सार्वजनिक जीवनातील जबाबदाऱ्या सांभाळताना कला क्षेत्राशी असलेलं माझं नातं मी नेहमीच जपलं आहे. अभिनयाच्या आवडीमुळेच मला अशोक सराफ यांच्यासारख्या अष्टपैलू कलाकारासोबत दोन वेगवेगळ्या मराठी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. एकत्र काम करण्याच्या या अनुभवामुळे आमचं मैत्रीचं नातं अधिक दृढ आणि समृद्ध होत गेलं.’

भुजबळांचं ट्विट-

‘मराठी रसिकप्रेक्षकांच्या अनेक पिढ्यांना आपल्या सहजसुंदर अभिनयाने निखळ आनंद देणारे अशोक मामा आजच्या डिजिटल युगात नाटक आणि चित्रपट क्षेत्रात तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. वयाच्या या टप्प्यावरही त्यांची कलेवरील निष्ठा आणि ऊर्जा आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना,’ अशा शब्दांत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

अशोक सराफ यांचा मुलगा अनिकेत जेव्हा पॅरिसमध्ये शिक्षण घेत होता, तेव्हा त्याच्यावर एक छोटा हल्ला झाला होता आणि त्याची बॅग चोरीला गेली होती. त्या बॅगमध्ये त्याचा पासपोर्ट होता. पुन्हा पासपोर्ट मिळवण्यासाठी आणि विद्यार्थी व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याचं भारतात येणं गरजेचं होतं आणि हे सगळं एका आठवड्यात व्हायला हवं होतं. तेव्हा छगन भुजबळांनी अशोक सराफ यांची खूप मदत केली होती. ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात खुद्द अशोक सराफ यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला होता. भुजबळसाहेब नेहमीच माझ्या पाठिशी उभे राहिले, माझ्या कुटुंबीयांना मदत केली, असं म्हणत त्यांनी छगन भुजबळांचा उल्लेख जवळचे मित्र असा केला होता.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *