Headlines

दादा कोंडकेंसोबत सुपर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री प्रचंड संतापली… आनंद दिघे आश्रमात ठेवले सर्व पुरस्कार; काय आहे प्रकरण?

दादा कोंडकेंसोबत सुपर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री प्रचंड संतापली… आनंद दिघे आश्रमात ठेवले सर्व पुरस्कार; काय आहे प्रकरण?
दादा कोंडकेंसोबत सुपर हिट चित्रपट देणारी अभिनेत्री प्रचंड संतापली… आनंद दिघे आश्रमात ठेवले सर्व पुरस्कार; काय आहे प्रकरण?


मराठी सिनेविश्वातील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री अभिनेत्री उषा चव्हाण दिवंगत अभिनेते दादा कोंडके यांच्यासोबत एकापेक्षा एक सिनेमात काम केलं आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि मराठी कलाविश्वात एक नवीन इतिहास रचला. पण आता उषा चव्हाण यांना मोठ्या संकटाचा सामना कराल लागत आहे… याचा माहिती स्वतः उषा चव्हान यांनी दिली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, उषा चव्हाण यांनी त्यांचे सर्व पुरस्कार आनंद दिघे आश्रमात ठेवले आहेत यामागचं मोठं कारण देखील समोर आले. सांगायचं झालं तर, हा संताप जमीनीनरून झाला. उषा चव्हाण यांनी खासगी जमीन आहे, जी कायद्याच्या कचाट्याच अडकली आहे… पुण्यातील धनकवडी येथे उषा चव्हाणांची खाजगी जमीन आहे, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे.

आता या प्रकरणाला पूर्ण वेगळं वळण लागलं आहे… उच्च न्यायालयाने संबंधित मालमत्ता अद्याप अविभाजित असल्याचं नमूद करून त्यांच्या मुलगा हृदयनाथ कडू देशमुख यांचा कायदेशीर हिस्सा मान्य केला. पण तरी देखील पूर्ण महापालिकेकडून टीडीआर Ganga Goel India Pvt. Ltd. बिल्डर कंपनाच्या फायद्यासाठी मंजूर करण्यात आल्याचा आरोप उषा चव्हाण यांनी केली आहे. यासंबंधी उषा यांनी एक पत्र लिहिलं आणि सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

पोस्टमध्ये उषा चव्हाण म्हणाल्या, ‘मी सतत संबंधित अधिकारी पंतप्रधान, मुख्यमत्री, नगरविकास त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी व निवेदनं दिला, मात्र माझे म्हणणे, कायदेशीर हक्क आणि न्यायालयीन आदेश दुर्लक्षित करण्यात आले. यंत्रनांनीच अशा प्रकारचं वर्तन केलं तर, माणसाने न्यायासाठी कोणाकडे पाहायचं… असा प्रश्न उपस्थित होत आहे.. ‘

उषा चव्हाण पुणे म्हणाल्या, ‘आज मी माझं संपूर्ण आयुष्य महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी दिलं. तरी देखील मला हक्कासाठी लढाई लढावी लागत आहे… तर सामान्य मराठी कुटुंबियांची परिस्थिती किती भयानक असेल याचा विचार देखील करतवत नाही…’ असं देखली उषा चव्हाण म्हणाल्या.
यामुळे ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांनी शासनाचा जीवनगौरव पुरस्कार केला परत केला आहे. पुण्यातील टीडीआर प्रकरणी न्याय न मिळाल्याने उषा चव्हाण आक्रमक झाल्या आहे. ज्यामुळे आनंद दिघे यांच्या प्रतिमेसमोर उषा चव्हाण यांनी पुरस्कार परत केला. न्यायालयाचा निकाल बाजूने, तरीही न्याय नाही उषा चव्हाण असा त्यांचा शासनावर आरोप आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *