Headlines

नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या एक्सिसमध्ये असताना…

नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या एक्सिसमध्ये असताना…
नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाल्या एक्सिसमध्ये असताना…


नाशिकच्या आयटी हबमध्ये कार्पोरेट धर्मांतरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आता या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी देखील आपले मत मांडले आहे. कार्यालयाच्या ठिकाणी असे होते याचा आपल्याला देखील अनुभव असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आजकाल लव्ह जिहादची प्रकरणे खूप भयानक आहेत. त्यांच्यावर योग्य एक्शन झाली पाहिजेच आता आपल्या मुलींनी थोड अलर्ट राहाणे गरजेचे आहे.आपली संस्कृती फॉलो केली तर असे कधी होऊ शकत नाही असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

कार्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे की मला खूप खराब वाटतं आणि खेद वाटत आहे की कॉर्पोरेट मध्ये हे होत आहे. माझ्या वेळेस जेव्हा मी ॲक्सिस बँकेत होती. तेव्हा अशा केसेस माझ्यापुढे झालेल्या आहेत.आणि व्हीसल ब्लोअरिंग होऊन त्या मुलांच्या अगेंस्ट ॲक्शन ही झालेली आहे. असा झाल्या झाल्या आपल्याला विसल ब्लोइंग करणं जरुरी, आपल्या सिनिअर्सना अस सांगणं जरूर आहे त्याच्यातूनच बदल होऊ शकतो असेही त्या यावेळी म्हणाल्या.

अमृता फडणवीस पुढे म्हणाल्या की स्त्रियांच्या केसेस झाल्या होत्या असे माझ्या लक्षात आले होते आणि त्यानंतर कारवाई झाली होती. मला हे वाटत आहे की आजकाल लव जिहादची प्रकरण खूप भयानक आहे. त्याच्यावर फर्म ॲक्शन आता झाली आहे.आता आपल्या मुलींनाही थोडं अलर्ट राहण जरुरी आहे. आपले संस्कृती फॉलो केले तर असं कधी होऊ शकत नाही. आपल्याला थोडा तिथे लक्ष देणं गरजेचे आहे एज्युकेशन,इंडियन व्हॅल्यूजमध्ये केले तर खूप मोठा फरक पडेल असेही त्या म्हणाल्या.

नारीशक्ती वंदन बिल थेट पास व्हावे

नारीशक्ती वंदन हा कायदा आमच्या सगळ्या स्त्रियांची आणि पुरुषांची इच्छा आहे की हा पारित व्हावा, स्त्रियांना त्यांचा हक्क मिळावा, प्रत्येक स्त्रीला विधानसभेत किंवा लोकसभेत ऍक्टिव्ह सहभागी व्हायला पाहिजे.सुरुवातीला जे चार टक्के होते.ते आता वाढलेले आहे. मात्र 33% पाहिजे कारण स्त्रियांना समान अधिकार मिळण्यासाठी हे जरुरी आहे असेही नागपूर येथे बोलताना अमृता फडणवीस यांनी सांगितले.

ही एक खूप मोठी गोष्ट आहे जी मोदीजी करून दाखवून राहिले आहेत. क्रेडिट घ्यायला किंवा हे लोक नामंजूर होण्यासाठी प्रयत्न करतील.पण मोदीजी भक्कम आहेत. त्यांच्या मागे सर्व स्त्रिया उभ्या आहेत आणि पुरुष पण आहेत. मला वाटतं नक्कीच हे बिल आज पास होईल असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे. या बिलाच्या मागे काय स्वार्थ असू शकतो? स्त्रियांचं काही भलं व्हावं यात कोणाचा काय स्वार्थ असेल,यातील दोन क्लॉजेस ठेवलेले नाहीत.त्यामुळे थेट हे बिल पास व्हायला हवे असेही फडणवीस म्हणाल्या.

खरातवर योग्य कारवाई सुरु आहे

खरात याने आपल्या बुद्धीचा उपयोग या गोष्टीसाठी केला याचा खूप खेद आहे आणि स्त्रिया त्याच्या बळी पडल्या याचे पण दुःख वाटतंय. याच्या अगेन्स्ट चांगली ॲक्शन चालू आहे आणि त्यांना कडक अशी शिक्षा व्हावी अशी भावना प्रत्येक स्त्रीच्या मनात आहे असेही अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *