Headlines

ना कोणाला फोन, ना लपून रेकॉर्डिंग, बंद खोलीत बसून तसल्या व्हिडिओचं मंथली प्लानचं अख्ख नेटवर्क कसं उभारलं, इंजिनिअरच खतरनाक डोकं

ना कोणाला फोन, ना लपून रेकॉर्डिंग, बंद खोलीत बसून तसल्या व्हिडिओचं मंथली प्लानचं अख्ख नेटवर्क कसं उभारलं, इंजिनिअरच खतरनाक डोकं
ना कोणाला फोन, ना लपून रेकॉर्डिंग, बंद खोलीत बसून तसल्या व्हिडिओचं मंथली प्लानचं अख्ख नेटवर्क कसं उभारलं, इंजिनिअरच खतरनाक डोकं


मुलगा तासन तास बंद खोलीत लॅपटॉप घेऊन बसायचा. आई-वडिलांना वाटायचं की, मुलगा इंजिनियर झालाय. काहीतरी मोठं काम करतोय. पण हा BTech झालेला इंजिनियर मुलगा इंटरनेटच्या काळ्या विश्वात असं नेटवर्क चालवत होता, ज्याने पोलीसही हैराण झालेत. इंटरनेटवरुन तसे व्हिडिओ डाऊनलोड करुन टेलिग्राम चॅनलवर विकायचा. या खेळातून त्याने जवळपास 1 कोटी 20 लाख रुपये कमावले. विकास सिंह असं या इंजिनियर मुलाचं नाव आहे. तो निवृत्त एअर फोर्स अधिकाऱ्याचा मुलगा आहे. चांगल्या कॉलेजमधून विकासने इंजिनियरींगची पदवी घेतली. खरंतर तो खूप काही चांगलं करु शकला असता. पण त्यान इंटरनेटची काळी दुनिया निवडली. तिथे तो तसे व्हिडिओ डाऊनलोड करुन टेलिग्राम चॅनलवर विकायचा. हा छोटा-मोठा खेळ नव्हता. तब्बल त्याने त्यातून 1 कोटी 20 लाखाचे व्यवहार केले होते.

17 मे 2026 रोजी हरदोई सायबर पोलीस ठाण्यात एक तक्रार आली. विषय गंभीर होता. एका अल्पवयीन विद्यार्थ्याचा आक्षेपार्ह व्हिडिओ टेलिग्रामवर शेअर केलाय असा आरोप होता. या तक्रारीनंतर पोलीस Action मध्ये आले. सायबर तपास सुरु झाला. पण चौकशी जशी सुरु झाली, तसं फक्त एक व्हिडिओ नाही, अख्ख नेटवर्क पोलिसांसमोर आलं.विकास सिंहने 2019 साली प्रयागराजच्या कॉलेजमधून BTech मध्ये इंजिनिअरींग केली. त्यानंतर नोकरी शोधण्याऐवजी त्याने दुसरा मार्ग निवडला. तो तासनतास खोलीत बंद असायचा. लॅपटॉप आणि मोबाइल हेच त्याचं जग बनलं. इंटरनेटवर कंटेट शोधण्याचं त्याला व्यसन जडलं. तोच त्याचा बिझनेस बनला.

7 हजार यूजर्स या नेटवर्कशी जोडलेले

2020 साली त्याने इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर नेटवर्क बनवायला सुरुवात केली. त्याने 21 सिक्रेट चॅनल आणि ग्रुप तयार केले. या चॅनल्सवर व्हिडिओ, प्रायवेट क्लिप आणि आक्षेपार्ह फोटो अपलोड केले जायचे. धक्कादायक हे सगळं नेटवर्क तो बिझनेस मॉडल सारखं चालवायचा. 350 रुपये मंथली प्लान, 450 रुपये में क्वार्टरली प्लान, 600 रुपये में हाफ ईयरली प्लान. पैसे देणाऱ्यांना या चॅनलचा एक्सेस मिळायचा. पोलीस चौकशीत तसे 10 हजार व्हिडिओ आणि 40 हजार फोटो सापडले. 7 हजार यूजर्स या नेटवर्कशी जोडलेले होते.

डिजिटल घाण पसरवत होता

विकास टेक्निकली खूप हुशार होता असं पोलिसांनी सांगितलं. त्याला छोटासा व्हिडिओ, क्लिप किंवा स्क्रीनशॉट जरी मिळाला, तर तो गुगल लेन्स आणि दुसऱ्या टुल्सच्या मदतीने त्या व्हिडिओच्या खऱ्या फाईलपर्यंत पोहोचायचा. मग, व्हिडिओ डाऊनलोड करायचा. टेलिग्राम चॅनलवर अपलोड करायचा. इंजिनिअर बनून चांगली टेक्नोलॉजी बनवण्याऐवजी तो डिजिटल घाण पसरवत होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *