Headlines

ना गाजावाजा, ना ग्रँड फंक्शन, फक्त 30 मिनिटांमध्ये अनिल कपूरचं झालेलं लग्न, समोर आला न पाहिलेला फोटो

ना गाजावाजा, ना ग्रँड फंक्शन, फक्त 30 मिनिटांमध्ये अनिल कपूरचं झालेलं लग्न, समोर आला न पाहिलेला फोटो
ना गाजावाजा, ना ग्रँड फंक्शन, फक्त 30 मिनिटांमध्ये अनिल कपूरचं झालेलं लग्न, समोर आला न पाहिलेला फोटो


Anil Kapoor : बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि सदाबहार अभिनेता अनिल कपूर आणि त्याची पत्नी सुनीता कपूर आज म्हणजेच 19 मे 2026 रोजी आपल्या लग्नाचा 42वा वाढदिवस साजरा करत आहेत. या खास निमित्ताने अनिल कपूरने सोशल मीडियावर पत्नी सुनीतासोबतचे काही खास आणि जुने फोटो शेअर करत एक भावूक पोस्ट लिहिली आहे. त्याच्या या पोस्टची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असून चाहते आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

अनिल कपूरने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्याच्या लग्नाशी संबंधित एक खास आठवण सांगितली आहे. त्याने लिहिलं की, त्याचं लग्न अतिशय साध्या पद्धतीने फक्त 30 मिनिटांत पार पडलं होतं. लग्नात कोणताही मोठा समारंभ, बँडबाजा किंवा गाजावाजा नव्हता. फक्त दोन्ही कुटुंबातील जवळचे नातेवाईक, आई-वडील आणि काही खास मित्रांच्या उपस्थितीत त्याने सात फेरे घेतले होते.

53 वर्षांपासून एकमेकांसोबत

अभिनेत्याने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, त्याच्या लग्नाची सुरुवात जरी साधी असली तरी काळानुसार त्यांचं नातं अधिक मजबूत आणि सुंदर होत गेलं. त्याने नमूद केलं की, लग्नाला 42 वर्षे पूर्ण झाली असली तरी ते आणि सुनीता मागील 53 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. प्रत्येक वर्षासोबत त्यांचं नातं अधिक घट्ट आणि खास होत गेल्याचं त्याने भावूक शब्दांत व्यक्त केलं.

अनिल कपूरने आणखी एक मजेशीर गोष्टही सांगितली. लग्नानंतर तो आणि सुनीता कपूर हनिमूनलाही गेले नव्हते. मात्र, या सगळ्या साधेपणातही त्यांचं प्रेम आणि एकमेकांवरील विश्वास कायम राहिला. त्याने लिहिलं की, ‘फक्त 30 मिनिटांत झालेलं ते साधं लग्न आयुष्यभराच्या सुंदर प्रवासात बदलून जाईल असं आम्हालाही वाटलं नव्हतं.’

सेलिब्रिटींकडूनही शुभेच्छा

पोस्टमध्ये अनिल कपूरने पत्नी सुनीतासाठी खास भावना व्यक्त करत तिला आपली सर्वात चांगली मैत्रीण, जीवनसाथी आणि संपूर्ण जग असल्याचं म्हटलं आहे. आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात साथ दिल्याबद्दल त्याने तिचे आभार मानले. चांगल्या आणि कठीण काळातही सुनीताने कायम साथ दिली आणि त्यामुळेच त्याचं नातं आजही इतकं मजबूत असल्याचं त्याने सांगितलं.

अनिल कपूरच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही या जोडप्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या नात्याचं कौतुक करत आजच्या काळातही प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणाचं सुंदर उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *