Headlines

पाऊस किंवा वादळाची पूर्वसूचना आयएमडीला आधीच कशी कळते? या मागचं शास्त्र समजून घ्या

पाऊस किंवा वादळाची पूर्वसूचना आयएमडीला आधीच कशी कळते? या मागचं शास्त्र समजून घ्या
पाऊस किंवा वादळाची पूर्वसूचना आयएमडीला आधीच कशी कळते? या मागचं शास्त्र समजून घ्या


पाऊस किंवा वादळाची पूर्वसूचना आयएमडीला आधीच कशी कळते? या मागचं शास्त्र समजून घ्याImage Credit source: IMD/TV9 Network

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात सर्वकाही पटापट होताना दिसत आहे. एक क्लिक केलं की काम झालं. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का? हवामानशास्त्रज्ञ पाऊस, वादळ, चक्रीवादळ याचा अंदाज काही दिवसांआधीच अचूक कसा ओळखतात. सध्या अल निनोचा प्रभाव पडला असून पाऊस लांबला आहे. त्यामुळे ही माहिती हवामान खात्याला आधीच कशी मिळाली असेल. तर हवामान खात्याला हवामान रडार, उपग्रह, निरीक्षण केंद्रे, समुद्रावरील सेन्सर्स आणि शक्तिशाली सुपर कम्प्युटर्सच्या माध्यमातून माहिती मिळते. हवामान खातं या माध्यमातून डेटा गोळा करतो असतो आणि त्यातून काही तास अभ्यास केल्यानंतर पुढचा अंदाज बांधला जातो.

डॉप्लर रडार : हवामान खात्याला अंदाज वर्तवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं साधन म्हणजे डॉप्लर वेदर रडार.. या माध्यमातून 150 ते 200 किलोमीटर भागातील ढग आणि हवामानच्या हालचालीवर लक्ष ठेवून असते. वातावरणात विद्युतचुंबकीय लहरी पाठवून ढगातील पावसाच्या थेंबावरून परावर्तित झालेल्या संकेतांचं विश्लेषण या माध्यमातून केलं जातं. यामुळे शास्त्रज्ञांना ढगांची हालचाल, पावसाची तीव्रता, वाऱ्याचा वेग याचा अंदाज निश्चित करता येतो.

सॅटेलाईट: हवामानाच्या हालचालीवर सॅटेलाईट लक्ष ठेवून असतं. खरं तर दर 15 मिनिटांनी सॅटलाईट हवामानाची माहिती पुरवतात. या माहितीत ढगांचे स्वरूप, आर्द्रता, समुद्राच्या पृष्ठभागाचं तापमान आणि दाबाचा अंदाज येतो. ही माहिती गोळा करून हवामानशास्त्रज्ञ चक्रीवादळ, मान्सूनचा प्रवास आणि इतर गोष्टींचा अंदाज बांधतात.

वेदर बलून : आयएमडी दर दोन दिवसांनी वेदर बलून सोडते. यात काही उपकरणं असतात. त्यामुळे वातावरणीय स्थितीचा अंदाज घेणं सोपं होतं. या माध्यमातून तापमान, हवेचा दाब, आर्द्रता आणि हवेचं स्वरूप यांची माहिती कळते.

मॉनिटरिंग स्टेशन : हवामानाचा प्रत्येक अंदाज वरूनच बांधला जातो असं नाही. तर जमिनीवरूनही आढावा घेतला जातो. भारतात ठिकठिकाणी वेदर स्टेशन लावले गेले आहेत. त्यातून तापमान, आर्द्रता, पाऊस आणि हवेच्या वेगाचा अंदाज रेकॉर्ड केला जातो.

समुद्री तळाचा अंदाज : खरं तर हवामानाच्या बहुतांश घडामोडी या समुद्रावर घडत असतात. त्यामुळे आयएमडी तरंगत्या उपकरणाचे जाळे देखील वापरते. यामुळे समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान, लाटा आणि सागरी प्रवाहाचा अंदाज येतो. या सर्व माध्यमातून डेटा गोळा केला जातो. त्यातून हवामानाचा अंदाज आधीच वर्तवला जातो. अद्ययावत तंत्रामुळे गेल्या काही वर्षात हा अंदाज अचूक वर्तवला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *