Headlines

पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या, भारताच्या एका कामगिरीने नुसता थयथयाट; पराभव पत्कारला!

पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या, भारताच्या एका कामगिरीने नुसता थयथयाट; पराभव पत्कारला!
पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या, भारताच्या एका कामगिरीने नुसता थयथयाट; पराभव पत्कारला!


India And Pakistan : पाकिस्तान हा भारताचा पारंपरिक शत्रू आहे. भारताने गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. जागतिक राजकारणातही भारताने आपले स्थान भक्कम केले आहे. पाकिस्तानला मात्र हे अद्याप जमलेले नाही. जपानच्या पंतप्रधान सनाए ताकाईची नुकत्याच भारताच्या दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी भारत-जपान यांच्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. ताकाईची यांच्या दौऱ्यानंतर भारताचे जपानसोबतचे संबंध आणखी वृद्धींगत झाले आहेत. पाकिस्तानला मात्र ही बाब पचलेली नाही. ताकाईची यांच्या दौऱ्यानंतर भारत आणि जपानने संयुक्तपणे जारी केलेल्या निवेदनात पाकिस्तान आणि दहशतवाद यांचा आलेला उल्लेख पाकिस्तानला चांगलाच झोंबला आहे.

पाकिस्तानला झोंबल्या मिरच्या

जपानच्या पंतप्रधान ताकाईची यांच्या भारत दौऱ्यानंतर दोन्ही देशांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात दहशतवादाचा निषेध करण्यात आला आहे. सोबतच सीमेपलिकडील दहशतवादाचा उल्लेख करताना पाकिस्तानचेही नाव त्यात लिहिण्यात आले आहे. यावरच पाकिस्तानने आक्षेप घेतला आहे. पाकिस्तानाल ही बाब पचलेली नाही. पाकिस्तानातील माजी राजनयिक अधिकारी अब्दुल बासित यांनी हा मुद्दा लावून धरत भारताला मोठे यश आल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचा हा मोठा पराभव असल्याचेही थेट मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पाकिस्तानचा थेट उल्लेख

अब्दुल बासित यांनी जर्मनीत पाकिस्तानचे राजदूत, भारतात पाकिस्तानचे उच्चायुक्त म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या या भूमिकेला विशेष महत्त्व आहे. त्यांनी पाकिस्तानातील एका वृत्तवाहिनीशी चर्चा करताना भारताकडून सीमेपलीकडच्या दहशवादाचा मुद्दा नेमहीच उपस्थित केला जातो. यात काही नवं नाही. कारण सीमेपलीकडचा हा दहशतवाद भारताच्या कोणत्याही सीमेकडचा असू शकतो. परंतु यावेळी भारत-जपानच्या संयुक्त निवेदनात पुन्हा एकदा सीमेपलीकडील दहशतवाद असा उल्लेख करण्यात आला आहे. ही बाब आपल्यासाठी अडचणीची ठरू शकते, असे मत अब्दुल बासित यांनी व्यक्त केले आहे.

जपान असा उल्लेख कसा करू शकतो?

तसेच, पाकिस्तानकडून होणाऱ्या दहशतवादी कारवाया असा उल्लेख या संयुक्त निवेदनात आहे, असे म्हणत जपान असा उल्लेख कसा करू शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, भारताची ही शिष्टाई पाकिस्तानला अडचणीत आणणारी असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *