Headlines

‘प्रचंड जळफळाट होतो…’, अमिताभ बच्चन यांच्यावर हेमा मालिनी यांनी घेतलेला आक्षेप कारण…

‘प्रचंड जळफळाट होतो…’, अमिताभ बच्चन यांच्यावर हेमा मालिनी यांनी घेतलेला आक्षेप कारण…
‘प्रचंड जळफळाट होतो…’, अमिताभ बच्चन यांच्यावर हेमा मालिनी यांनी घेतलेला आक्षेप कारण…


Hema Malini On Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आज वेगळ्या ओळखीची गरज नाही. गेल्या पाच दशकांपासून बिग बी बॉलिवूडवर राज्य करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी आजपर्यंत वेगवेगळ्या आणि एकापेक्षा एक भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. आजही अमिताभ बच्चन यांच्याकडे अनेक उत्तम भूमिका आहेत, यावर इतर कलाकार देखील हैराणी व्यक्त करतात. एकदा तर अभिनेत्री हेमा मालिनी यांनी यावर आक्षेप घेतलेला. हेमा मालिनी असं देखील म्हणालेल्या की, ‘अमिताभ बच्चन यांना चांगल्या भूमिका मिळतात त्यामुळे प्रचंड जळफळाट होतो…’

हेमा मालिनी एकदा ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या, जिथे त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केलं. त्यांना अमिताभ यांच्या ‘पा’ (Paa) आणि ‘बुड्ढा… होगा तेरा बाप’ (Bbuddah… Hoga Terra Baap) या सिनेमांबद्दल विचारण्यात आलं. त्यांना असं निदर्शनास आणून देण्यात आलं की, “अमिताभ बच्चन यांच्याकडे पहा; या वयातही त्यांनी एका सिनेमात मुलाची भूमिका साकारली आणि त्यानंतर ‘बुड्ढा… होगा तेरा बाप’मध्येही काम केलं.” यावर प्रतिक्रिया देताना हेमा म्हणाल्या, “ते अधिक नशीबवान आहेत. त्यांना सर्व प्रकारच्या भूमिका मिळतात, तर महिलांना मात्र तितक्या संधी मिळत नाहीत.”

त्यानंतर हेमा मालिनी यांना विचारण्यात आलं, बिग बींना चांगल्या भूमिका मिळतात, याचा तुम्हाला जळफळाट होतो. यावर हेमा मालिनी म्हणालेल्या, ‘प्रचंड जळफळाट होतो… पण आता मी प्रॉडक्शन हाऊस सुरु केलं आहे. ज्यामुळे मी तेच सिनेमांची निर्मिती करेल, ज्यामध्ये माझ्यासाठी चांगल्या भूमिका असतील… कधी मी, तर कधी ईशा… आमच्यासाठी चांगल्या भूमिका असतील, तर मी निर्मिती करेल… ‘, असं देखील हेमा मालिनी म्हणालेल्या.

हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांचे सिनेमे

हेमा मालिनी आणि अमिताभ बच्चन यांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. दोघांना आयकॉनिक ‘शोले’ सिनेमात एकत्र भमिका साकारताना पाहिलं आहे. त्यानंतर, ‘सत्ते पे सत्ता’, ‘गहरी चाल’, ‘नसीब’, ‘बागवान’, ‘कसौटी’, ‘दो और दो पांच’, ‘बुड्ढा होगा तेरा बाप’, ‘बाबुल’ आणि नास्तिक या सिनेमांमध्ये देखील दोघांनी एकत्र स्क्रिन शेअर केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *