Headlines

प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं डोकं चक्रावून टाकणारं कनेक्शन; खळबळजनक माहिती समोर!

प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं डोकं चक्रावून टाकणारं कनेक्शन; खळबळजनक माहिती समोर!
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं डोकं चक्रावून टाकणारं कनेक्शन; खळबळजनक माहिती समोर!


नीट (NEET) पेपरफुटीमुळे देशभरातील लाखो प्रामाणिक विद्यार्थ्यांचे प्रचंड मानसिक, आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झाले आहे. परीक्षेतील अनियमिततेमुळे परीक्षा रद्द होण्याची नामुष्की ओढवली, ज्यामुळे २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागत आहे. या प्रकरणात एक दोन नव्हे तर आरोपींचे सापळेच समोर आले आहेत. काहींनी प्लॅन तयार केला, काहींनी तो एक्झिक्युट केला तर काहींनी तो निकाली लावला. या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

‘सीबीआय’ने अटक केलेल्या मनीषा गुरुनाथ मांधारे या ‘नीट-यूजी २०२४’ परीक्षेच्या प्रक्रियेत तज्ज्ञ म्हणून कार्यरत होत्या. राष्ट्रीय परीक्षा संस्थेकडून (NTA) त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे बॉटनी आणि झूलॉजी विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंधित माहितीपर्यंत त्यांना थेट प्रवेश असल्याचे तपासात समोर आले आहे. दुसरीकडे, मनीषा वाघमारे हिची विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये चांगली ओळख होती. दोघीही कात्रजमधील राजस सोसायटी परिसरातील गंगा ओशन सोसायटीत वास्तव्यास असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. मनीषा वाघमारे हिची मुलगी मांधारेंकडे शिकायला जायची. तिच्यामुळे ओळख झाली, मग ब्युटीपार्लरमध्ये पेपर फुटीसाठी कट रचला जात होता. या कटामध्ये मोटेगावकर आणि कुलकर्णींचाही सक्रिय सहभाग होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *