Headlines

बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून देते म्हणत चक्क…

बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून देते म्हणत चक्क…
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून देते म्हणत चक्क…


नीट पेपरफुटी प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता पुण्यातील मनीषा वाघमारे हिचे नाव या रॅकेटमध्ये समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. सुखसागर नगर परिसरात राहणारी मनीषा वाघमारे ब्युटी पार्लर चालवत होती. मात्र गेल्या दोन वर्षांपासून ती नीट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना गाठून मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवत असल्याचा आरोप आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, मनीषा वाघमारे विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेत असे आणि त्यांना धनंजय लोखंडे याच्याशी जोडून देत होती. या कामासाठी ती मध्यस्थ म्हणून काम करत असल्याचे तपासात समोर आले आहे. विशेष म्हणजे, मेडिकल कॉलेजमध्ये अॅडमिशन करून देण्याच्या नावाखाली तिने एका कुटुंबाकडून तब्बल आठ लाख रुपये घेतल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पीडितांच्या म्हणण्यानुसार, पैसे घेतल्यानंतरही विद्यार्थ्याला कोणत्याही मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही. एवढेच नाही तर पैसे घेण्यासाठी मनीषाने नवीन बँक खातेही उघडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *