Headlines

भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात… राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात… राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
भाजप कुणाचाही मित्र नाही, जवळच्यांचा घात… राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ


नाशिक विधान परिषद निवडणुकीत महायुतीला मोठा धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी विजय मिळवल्याची माहिती समोर आली आहे. या निकालानंतर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. महायुतीतील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे रोहित पवार यांनीही या निकालावर भाष्य करत महायुतीवर अचूक निशाणा साधला. “मित्रपक्षांनी केसाने गळा कापला, भाजप कोणाचाही मित्र नाही तो जवळच्यांचाच घात करतो,” असा टोला त्यांनी लगावला. नाशिकमधील निकाल हेच त्याचे उदाहरण असल्याचेही त्यांनी म्हटले.

यावेळी रोहित पवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरही टीका केली. “मी गिरीश महाजन यांच्या हातून ज्युस पिला नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले. तसेच शेतकऱ्यांना नीट कर्जमाफी द्या आणि दुष्काळ जाहीर करा, अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *