Headlines

मोठी बातमी! अमेरिकेचा चीनला 440 व्होल्टचा धक्का, कोणी विचारही केला नसेल ट्रम्प आपल्या अपमानाचा असाही बदला घेऊ शकतात

मोठी बातमी! अमेरिकेचा चीनला 440 व्होल्टचा धक्का, कोणी विचारही केला नसेल ट्रम्प आपल्या अपमानाचा असाही बदला घेऊ शकतात
मोठी बातमी! अमेरिकेचा चीनला 440 व्होल्टचा धक्का, कोणी विचारही केला नसेल ट्रम्प आपल्या अपमानाचा असाही बदला घेऊ शकतात


अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच चीनचा दौरा केला आहे. परंतु डोनाल्ड ट्रम्प यांना आपल्या या दौऱ्यामध्ये काही खास हाती लागलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार एकही करार न करता डोनाल्ड ट्रम्प यांना माघारी परतावं लागलं. तर दुसरीकडे ट्रम्प यांना चीनने तैवानच्या विषयावर धमकी सुद्धा दिली. अमेरिकेनं तैवानच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये, अन्यथा युद्ध सुद्धा होऊ शकतं, अशी धमकी ट्रम्प हे चीनच्या दौऱ्यावर असताना त्यांना देण्यात आली होती. चीनकडून एकप्रकारे ट्रम्प यांचा मोठा अपमानच करण्यात आला. दरम्यान त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे डोनाल्ड ट्रम्प हे चीनच्या दौऱ्यावरून परताच अमेरिकेत हालचाली वाढल्या आहेत. चीन सोबतचे संबंध सुधारावेत म्हणून ट्रम्प यांनी चायनाचा दौरा केला होता, मात्र आता अमेरिकेचे चीनसोबचे संबंध अधिकच बिघडण्याची शक्यता आहे.

त्याला कारण देखील तसेच आहे, ते म्हणजे अमेरिकेच्या संसदेमध्ये असं एक विधेयक सादर करण्यात आलं आहे, ज्यामुळे चीनला मोठा धक्का बसू शकतो. शी जिनपिंग नाराज होऊ शकतात. डोनाल्ड ट्रम्प चीनच्या दौऱ्यावरून परतताच हे विधेयक सादर करण्यात आलं आहे. अमेरिकेमधील रिपब्लिकन पक्षाच्या दोन वरिष्ठ खासदारांकडून हे विधेयक सादर करण्यात आलं आहे. चीनमध्ये सध्या सत्तेत असलेल्या कम्युनिस्ट पार्टी (CCP) कडून असलेल्या संभाव्य धोक्यांकडे आता दुर्लक्ष करून चालणार नाही, याविरोधात अमेरिकेनं आपली कारवाई अधिक गतिमान करावी. याचाच एक भाग म्हणून अमेरिकेच्या सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकणाऱ्या चीनी व्यक्ती किंवा कंपन्या ओळखून अशा व्यक्ती किंवा संस्थांविरूद्ध अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने एक वर्षाच्या आत कारवाई करावी अशी मागणी या विधेयकात करण्यात आली आहे. दरम्यान हे विधेयक जर पास झालं तर संरक्षण क्षेत्राशी संबंधित असलेल्या चीनच्या अनेक कंपन्यांवर अमेरिकेत निर्बंध येण्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यानी तैवान संदर्भात देखील मोठं विधान केलं आहे. चीनने डोनाल्ड ट्रम्प यांना धमकावलं होतं की, तुम्ही तैवान प्रकरणात हस्तक्षेप करू नका, याचे परिणाम वाईट होतील. अमेरिका आणि तैवानमध्ये एक मोठी शस्त्र डील होणार आहे, चीनच्या या धमकीमुळे आता ही शस्त्र डील मागे पडणार असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र यावर बोलताना ट्रम्प यांनी मोठं विधान केलं आहे, त्यासाठी मला तैवानच्या प्रमुखांशी बोलावं लागेल असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांचं हे वक्तव्य देखील चीनसाठी मोठा धक्का मानला जात आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *